उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथील गोरखपूर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पती आणि सासूवर गंभीर आरोप केले आहे. लग्नानंतर सुद्धा हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचे महिलेने म्हंटल आहे. एके दिवशी, पीडितेच्या पतीने पत्नीला नशेचं औषध देऊन तिचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि तो व्हिडीओ डिलीट करण्यासाठी आरोपी पती आपल्याच पत्नीकडून १० लाख रुपयांची मागणी करत असल्याचं पीडित पत्नीचं म्हणणं आहे.
Latur Crime: व्याजाच्या वादातून तरुणावर तलवार आणि कोयत्याने हल्ला, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद
दुसऱ्या तरुणीसोबत अनैतिक संबंध
पीडित महिलेने सांगितले की, लग्न झाल्यापासून माझ्या सासरच्या मंडळींनी मला वाईट वागणूक दिली आहे. माझा नवरा सीतापूरमधील एका कारखान्यात काम करत असून तिथे काम करणाऱ्या एका तरुणीशी त्याचे अनैतिक संबंध आहेत. त्याच्याशी लग्न करण्यासाठी तो मला ब्लॅकमेल करत आहे.” पीडितेच्या म्हणण्यानुसार, पत्नीने तिच्या पतीच्या या कृत्याला विरोध केला असता त्याने पत्नीच्या विरोधात एक प्लॅन बनवला. एके दिवशी, आरोपीने पत्नीला मादक पदार्थ खायला देऊन तिला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर, तिचा अश्लील व्हिडीओ बनवला. आरोपी पतीने पीडितेचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तो व्हिडीओ डिलीट करण्यासाठी त्याने विवाहितेकडे 10 लाख रुपयांची मागणी केल्याचे सांगण्यात आले आहे.
तपास सुरु
पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चार मुलांना सोडून पत्नी प्रियकरासोबत पळाली; नवऱ्यावर गंभीर आरोप, दुसऱ्या पुरुषसोबत संबंध ठेवायला…
उत्तर प्रदेशात एटी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. चार मुलांना सोडून एक महिला आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. जेव्हा पतीने बायको बेपत्ता असल्याची तक्रार केली तेव्हा पोलिसांनी तिला पकडल. त्या नंतर जेव्हा तिला कोर्टात हजर करण्यात आल तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसला. बायकोने आपल्या नवऱ्यावर गंभीर आरोप केले. हे कारण ऐकून पत्नीने प्रियकरसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. चार मुले असूनही तिने सोडण्याचा निर्णय घेतला.
पतीला सोडून प्रियकरसोबत का गेली ?
पत्नीला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा तिने गंभीर आरोप नवऱ्यावर केले आहेत. पती रोज दारू पिवून यायचा आणि त्यातून तो शिवीगाळ करत असायचा. या सगळ्या त्रासाला मी कंटाळले होते. त्यातून मला मुक्तता हवी होती. रोज घरी येवून शिवीगाळ करणे हे नित्याचे झाले होते म्हणून मी निर्णय घेतला. या सगळ्या प्रकरणानंतर तिने नवऱ्यावर गंभीर आरोप केले की पती मला दुसऱ्या पुरुषसोबत संबंध ठेवायला सांगत आहे.






