Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: नशेत वाद अन् मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू; रक्ताचे कपडे बदलले अन् पोलिसांसमोर म्हणाला …

मित्रासोबत नशा करताना वाद झाला... काही वेळातच त्याच मित्राचा सिमेंटच्या गट्ट्याने खून केला. रक्ताने माखलेले कपडे बदलून आरोपी घरी गेला; पण त्यानंतर थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. विशेष म्हणजे, ज्या पोलिस ठाण्यात मृताच्या हत्येची तक्रार दाखल करण्यासाठी नातेवाईक आले, तिथेच आरोपी आधीपासून बसला होता.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 05, 2026 | 02:28 PM
Crime News: नशेत वाद अन् मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू; रक्ताचे कपडे बदलले अन् पोलिसांसमोर म्हणाला ...

Crime News: नशेत वाद अन् मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू; रक्ताचे कपडे बदलले अन् पोलिसांसमोर म्हणाला ...

Follow Us
Follow Us:
  • नशेत झालेल्या वादातून मित्राचा खून
  • सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून आकाश पाटोळे यांची हत्या
  • रक्ताने माखलेले कपडे बदलून आरोपी स्वतःच पोलिस ठाण्यात हजर
 

पुणे : नशा करताना झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात घडली. हत्या केल्यानंतर आरोपी घरी गेला, अंगावरील रक्ताने माखलेले कपडे बदलले आणि त्यानंतर थेट खडक पोलिस ठाण्यात जाऊन स्वतःच पोलिसांसमोर हजर झाला. एवढेच नव्हे, तर त्याने मित्राची हत्या केल्याची कबुलीही पोलिसांना दिली.

रक्ताच्या थारोळ्यात आढळला मित्र

मृत तरुणाचे नाव आकाश ऊर्फ अक्क्या ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (वय ३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे आहे. तर आरोपीचे नाव अजय ऊर्फ ‘चोर राजा’ सुखदेव शिंदे (वय ३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे आहे. आकाश आणि अजय हे मित्र होते. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी आकाश झोपेतून उठून घरात बसला होता. त्यावेळी त्याचे मित्र शंभू आणि अबिद त्याला भेटण्यासाठी आले. त्यांच्यासोबत आकाश घराबाहेर गेला. रात्री साडेआठच्या सुमारास काशेवाडी परिसरातील वजनकाट्याजवळील एका सोसायटीच्या गेटसमोर आकाश रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा: Crime News: मालाडमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

उपचारापूर्वीच मृत्यू

घटनेची माहिती मिळताच आकाशची वहिनी रुपाली पाटोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाशला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

नशेत वाद अन् सिमेंटच्या गट्ट्याने हल्ला

दरम्यान, अजयने स्वतःहून पोलिसांसमोर हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. नशा करताना आकाशसोबत वाद झाला. या वादातून संतापाच्या भरात आकाशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. हत्या केल्यानंतर अजय घरी गेला. अंगावरील रक्ताने माखलेले कपडे बदलले आणि त्यानंतर थेट खडक पोलिस ठाण्यात जाऊन हजर झाला.

हेही वाचा: उत्तराखंडचा २२ वर्षीय तरुण पुण्यात शिक्षणासाठी आला होता; मित्रांसोबत फिरायला गेला अन् परतलाच नाही

तक्रार देण्यासाठी गेल्या अन् आरोपी समोरच

आकाशच्या हत्येची तक्रार देण्यासाठी रुपाली पाटोळे खडक पोलिस ठाण्यात पोहोचल्या. त्यावेळी तेथे आधीपासूनच एक तरुण बसलेला होता. तो आकाशचा मित्र अजय ऊर्फ ‘चोर राजा’ असल्याचे समोर आले. त्यानेच आकाशची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. रुपाली पाटोळे यांच्या फिर्यादीवरून खडक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अजयला पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Kashewadi pune friend murder cement block khadak police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • murder case news
  • pune crime case

संबंधित बातम्या

पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सात राऊंड फायरिंगनंतर मारेकऱ्यांपैकी एक जखमी? संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’चा शोध सुरू
1

पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सात राऊंड फायरिंगनंतर मारेकऱ्यांपैकी एक जखमी? संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’चा शोध सुरू

Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर
2

Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
3

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
4

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.