
crime (फोटो सौजन्य: social media)
पाठीवरच्या बॅगेत दगड आणि विटा भरले
आत्महत्या करणाऱ्या दंतचिकित्सकाचे नाव अवधूत मुळे असे आहे. तो जयसिंगपूर येथील रहिवासी होता. तो गेल्याकाही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता असे त्याच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितले आहे. घटनेच्या दिवशी अवधूतने नियोजनबद्ध पद्धतीने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
अवधूतने आपल्या पाठीवरील बॅगेत दगड आणि विटा भरल्या होत्या. त्यानंतर त्याने तलावात उडी घेतली. बॅगेत दगड आणि विटा भरल्या कारण तलावात उडी घेतल्यानंतर बाहेर येण्याची शक्यता कमी होते.
Santosh Deshmukh हत्या प्रकरणात मोठी बातमी! वाल्मीक कराडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
आत्महत्ये पूर्वी मित्रांना पाठवला शेवटचा संदेश
आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या काही मित्रांना आणि ओळखीच्या व्यक्तींना मोबाईलवर एक मेसेंज पाठवले होते. याच मेसेजमध्ये त्याची मानसिक अवस्था आणि कौटुंबिक कारणांमुळे आलेली निराशा स्पष्टपणे जाणवते. मेसेज केल्यानंतर त्याने दुचाकीने थेट जयसिंगपूरमधील राजाराम तलाव गाठला. तलावाच्या काठावर दुचाकी उभी करून त्याने एक चिठ्ठी लिहिली. त्यांनतर त्याने तलावात उडी मारली. या सुसाईड नोटमध्येही कौटुंबिक तणावाचा उल्लेख असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.
गावात शोककळा
स्थानिकांना ही घटना लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाच्या मदतीने तलावातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेहा ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेनंतर कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे. गावात हळहळ व्यक्त केले जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.
Ans: सुसाईड नोट, शेवटचे मोबाईल संदेश आणि बॅगेतील दगड.
Ans: कौटुंबिक तणाव व मानसिक अस्वस्थता, अशी प्राथमिक माहिती.
Ans: पोलीस सखोल तपास करत असून नोट व संदेशांच्या आधारे चौकशी सुरू आहे.