वाल्मीक कराडचा जामीनासाठी हायकोर्टात अर्ज (फोटो- सोशल मीडिया)
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड तुरुंगात
वाल्मीक कराडचा हायकोर्टात अर्ज
वाल्मीक कराडवर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल
बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होऊन गेले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तुरुंगात आहे. या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य आरोपी म्हणून तुरुंगात आहे. दरम्यान वाल्मीक कराड ने जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. वाल्मीक कराडने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.
वाल्मीक कराडने हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. यावर आता 16 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडवर केज पोलिस ठाण्यात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मीक कराड गेल्या वर्षभरापासून अटकेत आहे.
परळीच्या राजकारणात दबदबा असलेला कोण आहे वाल्मिक कराड?
मूळचा परळी तालुक्यातील असलेला वाल्मिक कराड हा पांगरी गोपीनाथ गड गावचा रहिवासी होता. शेतकरी कुटुंबात वाल्मिकचा जन्म झाला. घरची परिस्थितीतीही हालाखीची होती. वाल्मिकने दहावीपर्यंत कसेबसे शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो परळीत आला. पैसे मिळवण्यासाठी त्याची कसरत सुरू होती. त्यासाठी तो परळीतून भाड्याने व्हीसीआर आणायचा आणि गावच्या जत्रेत सिनेमे दाखवायचा. त्यासाठी तो तिकीटाचे पैसेही घ्यायचा. हे सर्व सुरू असतानाच वाल्मिक दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू असलेल्या फुलचंद कराड यांच्या संपर्कात आला. फुलचंद कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या घरी वाल्मिकला घरगडी म्हणून कामाला ठेवलं. घरात भाजीपाला, किराणा सामान, दूध, घरातली घरगड्याची छोटी -मोठी कामं वाल्मिक करू लागला. हे सर्व करता करता त्याने गोपीनाथ मुंडे यांचा विश्वासही संपादन केला.
Who is Walmik Karad: परळीच्या राजकारणात दबदबा असलेला कोण आहे वाल्मिक कराड?
हळूहळू वाल्मिक कराड परळीतील थर्मल प्लान्टमध्ये कंत्राट मिळू लागली. कराडच्या पाठिशी मुंडेंचं नाव जोडलं असल्यामुळे परळीत हळूहळू त्याचा प्रभाव वाढू लागला होता. 1995 मध्ये त्याची वैद्यनाथ महाविद्यालयाच्या संचालक मंडळाच्या निवडणूक झाली. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सुरू असलेल्या सर्वसाधारण सभेत तुफाण हाणामारी झाली. हा सराजा सुरू असतानाच तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांनी बंदुकीतून गोळी झाडली आणि ती थेट वाल्मिकच्या पायाला लागली. त्यानंतर तो गोपीनाथ मुंडेचा त्याच्यावरचा विश्वास अधिकच वाढला.
संतोष देशमुख हत्येला एक वर्ष पूर्ण; कन्या वैभवी देशमुखने आता उपमुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
गेल्या दहा वर्षात बीडच्या राजकारणात धनंजय मुंडेंचा दबदबा वाढला, त्यामुळे वाल्मिक कराडचे वर्चस्वही वाढू लागले. त्यामुळे बीडच्या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कोण असावा? याचेही निर्णय वाल्मिकच्या मर्जीने होऊ लागले होते, अशी चर्चा आहे. पण गेल्या वर्षी 9 डिसेंबर 2024 संतोष देशमुख यांची हत्या झाली. तेव्हापासून वाल्मिक फरार होता. त्यानंतर त्याने यंत्रणेसामोर आत्मसमर्पण केले.






