Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: ऊसाच्या शेतात विधवा महिलेचा विवस्त्रावस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं नेमकं?

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे औषध फवारणीसाठी गेलेल्या 55 वर्षीय छबूताई पाटील यांचा उसाच्या शेतात विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळला. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 26, 2026 | 01:25 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • औषध फवारणीसाठी गेलेल्या महिलेचा उसाच्या शेतात मृतदेह आढळला.
  • धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज.
  • अत्याचारानंतर खून झाला का? याबाबत पोलिसांचा तपास सुरू.
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या विधवा महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याचे समोर आले आहे. उसाच्या शेतात विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला तेव्हा ही घटना समोर आली. घडलेली घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे रविवारी घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nagpur Crime: “क्या रे जॉनी…” म्हणत मारली टपली, संतापातून तरुणाचा खून; CCTV मध्ये कैद थरार

काय घडलं नेमकं?

या घटनेतील हत्या झालेल्या महिलेचे नाव छबुताई सर्जेराव पाटील (वय 55) असे आहे. छबुताई पाटील या रविवारी दुपारच्या सुमारास महसूल की नावाच्या शेतावर उसावर औषध फवारणी करण्यासाठी गेल्या होत्या. मुलगा बाहेरगावी असल्याने आणि पतीचे निधन झाल्याने त्याचं शेतीची सर्वे कामे करत होत्या. तसेच गवतले घरी एकटाच राहत होत्या. रविवारी दारात घातलेलं वाळवंत तसंच होतं आणि दरवाजा देखील बंद होता त्यामुळे शेजाऱ्यांनी चौकशी सुरू केली. मात्र रात्री उशीर झाला तरीही फोन उचलत नसल्याने पुतण्या आणि नातेवाईकांनी शोध सुरू केला.

छबुताई या शेतात गेल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी शेतात धाव घेऊन त्यांचा शोध सुरू केला. शेताच्या बांधावर औषधाने भरलेला पंप आणि चप्पल आढळले. त्यानंतर पुतण्याने त्यांना फोन केला. तेव्हा उसाच्या ओव्यातून फोनचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तर शेताच्या मध्यभागी उसाच्या सरीत त्यांचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. अज्ञात व्यक्तीने हातावर आणि डोक्यावर वर्मी घाव घातल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. हत्या करून चेहरा कापडाने झाकलेला अवस्थेत होता. त्यामुळे ही अत्याचार करून हत्या केली आहे का अशी चर्चा परिसरात होत आहे. उत्तरिय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह नेण्यात आला. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मात्र त्यांची हत्या का आणि कोणी केली आणि कशी झाली याचा उत्तर अद्याप स्पष्ट नसला तरी पोलीस याच प्रश्नाचा देखील शोध घेत आहेत.

Pune Crime : ‘तुम्ही पोलीस विकले गेले’; मद्यपी कार चालकाकडून पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुकी

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिलेचे नाव काय होते?

    Ans: छबूताई सर्जेराव पाटील (वय 55) असे मृत महिलेचे नाव होते.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे घटना घडली.

  • Que: पोलिस काय तपास करत आहेत?

    Ans: हत्या नेमकी कशी झाली आणि अत्याचारानंतर खून झाला का याचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Kolhapur crime body of a widowed woman found naked in a sugarcane field what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न
1

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात
2

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
3

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.