Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

सहा लाखांचे कर्ज घेतले, पण सावकाराला दिले तब्बल अडीच कोटी रुपये... तरीही पैशांचा तगादा थांबला नाही! गुंडांची भीती, जीवे मारण्याच्या धमक्या अन् दोन वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न; कोल्हापुरातील या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 02, 2026 | 03:59 PM
कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:
  • सहा लाखांच्या कर्जापोटी अडीच कोटी ५२ लाख रुपये दिल्याचा दावा
  • गुंडांची भीती दाखवून धमकी; दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप
  • एटीएम कार्ड, चेकबुक व दागिने ताब्यात घेतल्याचे फिर्यादीत नमूद
 

कोल्हापूर : खासगी सावकाराकडून घेतलेल्या सहा लाख रुपयांच्या कर्जापोटी अभियंता महिलेने तब्बल अडीच कोटी रुपये दिल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे. एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही पैशांसाठी तगादा लावण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. वसुलीसाठी गुंडांची भीती दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, तसेच दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अभियंता गीता स्वप्नील मोरे (वय ३२, रा. सोनाळी, ता. करवीर; सध्या चिंतामणी पार्क, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सिद्धेश मिलिंद गायकवाड (वय २४), अजिंक्य संभाजी जाधव (२५) आणि स्वाती सुनील सिन्नर (२३, सर्व रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सहा लाखांचे कर्ज, दरमहा १० टक्के व्याज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता मोरे यांना व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी २९ सप्टेंबर २०२१ रोजी खासगी सावकार सिद्धेश गायकवाड याच्याकडून सहा लाख रुपये घेतले होते. या रकमेवर दरमहा १० टक्के व्याज देण्याचे ठरले होते. वेळेत मुद्दल आणि व्याजाची परतफेड न झाल्यास सहा लाखांच्या बदल्यात १२ लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट घातल्याचा आरोप आहे. आर्थिक अडचणींमुळे मोरे यांना वेळेत परतफेड करता आली नाही. त्यानंतर गायकवाड याने १२ लाख रुपयांच्या वसुलीसाठी तगादा लावण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा: Crime News: डॉक्टरांनी सांगितले ‘तातडीने सिझेरियन करा’… उपचार रखडले अन् ९ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचाही…

गुंडांची भीती दाखवून धमकी

पैशांची वसुली करण्यासाठी गायकवाड याने स्वप्नील जाधव, बल्ली भाई आणि अजित तिवडे यांच्या नावाने धमक्या दिल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच गीता मोरे यांच्या आईसह अन्य नातेवाईकांना फोन करून पैशांसाठी तगादा लावण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याचदरम्यान त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

अडीच कोटी रुपये दिल्यानंतरही पैशांची मागणी

सततच्या धमक्यांमुळे भीतीपोटी मोरे यांनी नातेवाईकांचे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवून पैसे उभे केले. वेळोवेळी सावकाराला रक्कम परत करण्यात आली. अखेर २ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी तब्बल २ कोटी ५२ लाख ५४ हजार ९२२ रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही पैशांसाठी तगादा सुरूच राहिल्याचा आरोप आहे. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर गीता मोरे यांनी पोलिसांत धाव घेतली.

हेही वाचा: Thane News: पूर्णेकर हत्या महिनाभर आधीच ठरली? मॉक ड्रिल करून आखला कट; दोन शूटर अलिबागजवळून ताब्यात

एटीएम कार्ड, चेकबुकही घेतल्याचा आरोप

फिर्यादीनुसार, गायकवाड याने स्टॅम्पवर नोटरी करून घेतल्यानंतर गीता मोरे यांचे सोन्याचे दागिने, चेक आणि एटीएम कार्ड ताब्यात घेतले. त्यांच्या बँक खात्यात जमा होणारी रक्कमही एटीएमच्या माध्यमातून परस्पर काढून घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय सोनाराकडे गहाण ठेवलेले लाखो रुपयांचे दागिनेही परस्पर सोडवून घेतल्याचे मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सिद्धेश गायकवाड, अजिंक्य जाधव आणि स्वाती सिन्नर यांच्यासह स्वप्नील जाधव (लाला शेठ), सरिता मिलिंद गायकवाड, तेजस चंद्रकांत माने, गायत्री अजिंक्य साळोखे-गायकवाड आणि अजिंक्य अशोक साळोखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करवीर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Kolhapur private lender six lakh loan two crore fifty two lakh recovery engineer woman case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • In Kolhapur
  • Kidnaped Case
  • kidnapping
  • Kidnapping news
  • Kolhapur Crime
  • Loan Issue
  • MONEY

संबंधित बातम्या

Money Management Tips: श्रीमंत व्हायचंय? अंकुर वारिकू यांचे ‘हे’ ६ सोपे आर्थिक नियम एकदा वाचाच..
1

Money Management Tips: श्रीमंत व्हायचंय? अंकुर वारिकू यांचे ‘हे’ ६ सोपे आर्थिक नियम एकदा वाचाच..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.