Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

kolhapur Crime: पंढरपूर दर्शनाच्या बहाण्याने गोठ्यात नेलं, माजी सरपंचेची गळा आवळून हत्या; मृतदेह समुद्रात फेकण्याचा कट, मात्र..

कोल्हापूरच्या शाहूवाडीतील माजी सरपंच सुरेखा न्यारे यांची पंढरपूर दर्शनाच्या बहाण्याने गोठ्यात नेऊन गळा आवळून हत्या करण्यात आली. मृतदेह समुद्रात फेकण्याचा आरोपीचा कट भाच्याच्या सतर्कतेमुळे उधळला. मुख्य आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू पाटीलला भिवंडी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 29, 2026 | 02:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पंढरपूर दर्शनाचे आमिष दाखवून गोठ्यात नेऊन माजी सरपंचांची हत्या.
  • मृतदेह समुद्रात फेकण्याचा कट भाच्याने पोलिसांना माहिती दिल्याने फसला.
  • मुख्य आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू पाटील अटकेत; शाहूवाडी पोलीस तपास करत आहेत.
 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथे एका धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी नेण्याचे आमिष दाखवत माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय ५०) यांना गोठ्यात नेऊन गळा आवळून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपीने मृतदेह समुद्रात फेकून पुरावे नष्ट करण्याचाही कट रचला होता. मात्र, भाच्याच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण थरार उघडकीस आला आणि मुख्य संशयित आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू पाटील याला भिवंडी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Wardha Crime: Instagram नोटिफिकेशनवर क्लिक अन् 12.33 लाखांचा गंडा! IPOच्या आमिषाने तरुणाची ऑनलाईन फसवणूक

काय घडलं नेमकं?

माजी सरपंच सुरेख न्यारे आणि प्रकाश उर्फ बाबू पाटील यांचे अनैतिक संबंध होते. गेल्या काही दिवसांपासून सुरेखा यांनी प्रकाशाकडे “माझ्याशी लग्न कर” असा वारंवार तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून प्रकाशने त्यांच्या हत्येचा कट रचला.

कशी केली हत्या?

आरोपी प्रकाशने सुरेखा यांना आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊया असे म्हंटले. सुरेखा जायला तयार झाली. प्रकाशने त्यांना चारचाकी गाडीत बसवले. त्यानंतर गावाबाहेर असलेल्या स्वतःच्या जनावरांच्या गोठ्यात जाऊन वैरण घालून मग पुढे निघूया, असे सांगून तो त्यांना गोठ्याकडे घेऊन गेला. तिथे संधी साधून रविवारी त्याने सुरेखा यांचा गळा आवळून निर्घृण खून केला. हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी त्याने सुरेखाचा मृतदेह स्वतःच्याच गाडीत टाकला आणि तो भिवंडीच्या दिशेने निघाला. प्रवासादरम्यान त्याने आपल्या भाच्याला (संदेश मोरे) या कृत्याची माहिती दिली आणि मृतदेह समुद्रात फेकण्यासाठी मदत मागितली. मात्र, संदेश यांनी कोणतीही मदत न करता तातडीने भिवंडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. भिवंडी पोलिसांनी तत्परता दाखवत गाडी अडवून आरोपी प्रकाश पाटील याला बेड्या ठोकल्या आणि मृतदेह ताब्यात घेतला.

आरोपी अटकेत

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हा गुन्हा पुढील कारवाईसाठी शाहूवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी शिरगाव येथे सुरेखा न्यारे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटणार? कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड; सुरज ठोंबरे टोळीची उडी

💡

Frequently Asked Questions

  • Que: माजी सरपंच सुरेखा न्यारे यांची हत्या कशी करण्यात आली?

    Ans: पंढरपूर दर्शनाच्या बहाण्याने गोठ्यात नेऊन त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला.

  • Que: आरोपीचा कट कसा उघडकीस आला?

    Ans: आरोपीच्या भाच्याने भिवंडी पोलिसांना माहिती दिल्यामुळे कट उघडकीस आला.

  • Que: या प्रकरणातील मुख्य आरोपी कोण आहे?

    Ans: प्रकाश ऊर्फ बाबू पाटील.

Web Title: Kolhapur crime former sarpanch strangled to death after being lured to a cowshed under the pretext of a pilgrimage to pandharpur plot to dump the body in the sea but

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

कोल्हापूरच्या ‘वाघिणी’चा ऐतिहासिक सुवर्णगोल! सानिकाने उतरवला चीनचा माज; भारत पुन्हा ‘आशिया चॅम्पियन’
1

कोल्हापूरच्या ‘वाघिणी’चा ऐतिहासिक सुवर्णगोल! सानिकाने उतरवला चीनचा माज; भारत पुन्हा ‘आशिया चॅम्पियन’

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
4

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.