Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! लग्नात अडथळा ठरणाऱ्या महिलेला शिक्षकाने संपवलं; तिघांना अटक

कोल्हापूरच्या तिलारी घाटात सापडलेल्या 25 वर्षीय महिलेच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले आहे. प्रेमसंबंध आणि लग्नातील अडथळ्याच्या संशयातून एका शिक्षकाने वडील आणि मामाच्या मदतीने महिलेचा खून करून मृतदेह घाटात फेकल्याचे पोलिस तपासात समोर आले. तिघांना अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 13, 2026 | 01:22 PM
सदनिकेच्या बाहेर पादत्राणांच्या जाळीत (शू रॅक) चावी ठेवणे महागात

सदनिकेच्या बाहेर पादत्राणांच्या जाळीत (शू रॅक) चावी ठेवणे महागात

Follow Us
Follow Us:
  • प्रेमसंबंधातून शिक्षकाने महिलेच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप.
  • क्रूझरमध्येच खून करून मृतदेह तिलारी घाटात फेकला.
  • सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिस तपासातून गुन्ह्याचा उलगडा.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाटातून समोर आलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. लग्नात अडथळा ठरत असल्याच्या संशयातून एका शिक्षकाने आपल्या वडील आणि मामाच्या मदतीने 25 वर्षीय महिलेचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. मृतदेह घाटातील झुडपात फेकून अपघाताचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या तपासामुळे अखेर या थरारक गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.

काय नेमकं प्रकरण?

गंगव्वा सत्यवान हंचीमणी (वय 25, रा. वंटमोरी, जि. बेळगाव) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. 29 मे रोजी तिलारी घाटातील कोदाळी गावाच्या हद्दीत झुडपात एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी कोल्हापूर, सांगली, बेळगाव, विजापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा येथील तब्बल 199 बेपत्ता महिलांची माहिती तपासली.

Solapur Crime: मुख्याध्यापकाने पत्नी-मुलांना विष पाजून केली आत्महत्या; 22 पानांची सुसाईड नोट सापडली

दरम्यान, पोलिसांनी बेळगावमधील तिलारीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात 25 मेच्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एक क्रूझर घाटातून दोडामार्गच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अवघ्या 20 मिनिटांत तीच गाडी पुन्हा तिलारीच्या दिशेने परतताना दिसली. पोलिसांनी गाडीचा नंबर ट्रेस केला असता, त्याच गाडीचा 25 मे रोजी कोदाळी गावाजवळ अपघात झाल्याची माहिती समोर आली.

सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना मृत महिला गंगव्वा हंचीमणी असल्याचे स्पष्ट झाले. तसेच ती एका तरुणासोबत दुचाकीवर फिरत असल्याचेही समोर आले. पोलिसांना संबंधित तरुण शिनोळी फाट्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला.

शिक्षकाचं महिलेसोबत प्रेमसंबंध

मुख्य आरोपी बसवराज यल्लाप्पा करणावर (वय 33) हा कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील राजकट्टी येथील शिक्षक आहे. त्याचे घटस्फोटित गंगव्वासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गंगव्वा त्याच्या होणाऱ्या लग्नात अडथळा आणत असल्याच्या संशयातून त्याने हा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

बसवराजने गंगव्वाला विशाळगडला फिरायला जाण्याचा बहाणा करून सोबत नेले. दोघे दुचाकीवरून निघाले असताना वाटेत आरोपीचे वडील आणि मामा क्रूझर घेऊन आले. शिनोळी येथे दुचाकी ठेवून गंगव्वाला क्रूझरमध्ये बसवण्यात आले. त्यानंतर क्रूझरमध्येच तिचा खून करून मृतदेह तिलारी घाटातील झुडपात फेकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी अटकेत

या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी बसवराज यल्लाप्पा करणावर याच्यासह त्याचे वडील यल्लाप्पा महिलाप्पा करणावर (वय 57) आणि मामा लगमाप्पा अंकलगी (वय 37, रा. केंचनकट्टी, जि. बेळगाव) यांना अटक केली आहे. तर क्रूझर चालक बाबू हा अपघातात जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असून, त्यालाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत या थरारक हत्याकांडाचा उलगडा केल्याने त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भरधाव ट्रक थेट लॉजमध्ये घुसला, एकाचा मृत्यू तर एक जखमी; धुळे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या झालेल्या महिलेचे नाव काय आहे?

    Ans: गंगव्वा सत्यवान हंचीमणी असे मृत महिलेचे नाव आहे.

  • Que: पोलिसांनी आरोपींपर्यंत कसे पोहोचले?

    Ans: सीसीटीव्ही फुटेज आणि वाहन क्रमांकाच्या तपासातून पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले.

  • Que: या प्रकरणात किती जणांना अटक करण्यात आली?

    Ans: शिक्षक, त्याचे वडील आणि मामा अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Kolhapur crime kolhapur shaken teacher kills woman who was an obstacle to his marriage three arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न
1

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात
2

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
3

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.