Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Impact : नवराष्ट्रच्या बातमीचा धसका! चोरीला गेलेले कारचे तीन टायर अवघ्या २४ तासांत पुन्हा जागेवर

नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-६ येथील लक्ष्मी पार्क अपार्टमेंटसमोर उभी असलेल्या आर्टिका कारचे तीन टायर आणि अलॉय रिंग चोरीला गेल्यानंतर अवघ्या २४ तासांत ते पुन्हा कारला बसवून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची नवराष्ट्रमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आणि कोपरखैरणे पोलिसांनी सीसीटीव्ही तपास सुरू केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 16, 2026 | 12:45 PM
नवराष्ट्रच्या बातमीचा धसका! चोरीला गेलेले कारचे तीन टायर अवघ्या २४ तासांत पुन्हा जागेवर

नवराष्ट्रच्या बातमीचा धसका! चोरीला गेलेले कारचे तीन टायर अवघ्या २४ तासांत पुन्हा जागेवर

Follow Us
Follow Us:
  • नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चोराला पडली धडकी
  • चोरीला गेलेले तीन टायर-अलॉय रिंग २४ तासांत पुन्हा कारला बसवून पलायन
  • अन् चोराने टायर पुन्हा वाहनांना बसवले
  • नवराष्ट्र बातमीने सूत्र हलली
सावन वैश्य, नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर-६ येथील लक्ष्मी पार्क अपार्टमेंटसमोर उभी असलेल्या ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या आर्टिका कारचे तीन टायर अलॉय रिंगसह चोरीला गेल्यानंतर या प्रकरणाने बुधवारी अनपेक्षित वळण घेतले. नवराष्ट्रमध्ये ही घटना ठळकपणे प्रसिद्ध होताच आणि कोपरखैरणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केल्याची माहिती चोरट्यांपर्यंत पोहोचली असावी. त्यानंतर अवघ्या २४ तासांत चोरीला गेलेले तीनही टायर-अलॉय रिंग पुन्हा त्याच कारला बसवून ठेवण्यात आल्याने परिसरात आश्चर्याची लाट पसरली.

एमएच-०५-ईएल-००५५ क्रमांकाची आर्टिका कार सोमवारी रात्री पार्क करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे विमानतळावरील बुकिंगसाठी वाहन घेण्यास गेलेल्या मालकाला कारचे तीन टायर गायब असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांचे बुकिंग रद्द झाले आणि आर्थिक फटकाही बसला. घटनेनंतर कोपरखैरणे पोलिसांनी एमसी नोंद करून तपास सुरू केला. त्यानंतर ‘नवराष्ट्र’ने “नवी मुंबईत चोरीच्या घटनांचा धुमाकूळ; आता चारचाकींचे टायर-रिंगही चोरट्यांच्या निशाण्यावर” या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. बातमीची चर्चा सुरू झाली आणि पोलिसांनी सीसीटीव्ही तपासाला वेग दिला.

Navi Mumbai: प्रकल्पग्रस्तांची घरे आणि सिडको घरे फ्री होल्ड करावीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मंदा म्हात्रेंची मागणी

मंगळवारी रात्री मात्र वाहनमालकाला वाशी वरून घरी आल्यानंतर गाडी जवळ बघितले आणि त्यांना धक्काच बसला. चोरीला गेलेले तीनही टायर आणि अलॉय रिंग पुन्हा कारला व्यवस्थित बसवलेले होते. त्यामुळे परिसरात आता एकच चर्चा सुरू आहे, हा चोर होता की ‘सर्व्हिस सेंटरचा नाईट शिफ्ट कर्मचारी’? चोरी करून २४ तासांत माल परत बसवणारा असा ‘प्रामाणिक’ चोर नवी मुंबईत पहिल्यांदाच पाहायला मिळाला, अशी मिश्कील प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

मात्र या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. चोरी करून नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा पोलिसांच्या कारवाईची भीती वाटल्याने माल परत ठेवण्यात आला का? की यामागे इतर कोणता हेतू होता? याचा उलगडा होणे आवश्यक आहे. सध्या कोपरखैरणे पोलिस सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर सर्व शक्यतांची पडताळणी करत आहेत. टायर परत मिळाले असले तरी चोरी करणारा कोण, त्याचा उद्देश काय आणि कायद्याचा धाक निर्माण झाला का, याचे उत्तर मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. नवराष्ट्रच्या बातमीचा हा इम्पॅक्ट मानायचा की पोलिसांच्या तपासाची भीती, याचा निर्णय तपासानंतर होईल; मात्र इतके नक्की, की या घटनेने चोरट्यांनाही बातम्यांची दखल घ्यावी लागते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Kopar Khairane Slab Collapse: नवी मुंबईत मोठी दुर्घटना! कोपरखैरणेत ३० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; २ वर्षांपूर्वीच…

Web Title: Koparkhairane stolen car tyres returned after news report cctv investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Navarashtra Impact
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Navi Mumbai: नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय उड्डाणाला सुरुवात! अबू धाबीहून पहिले विमान दाखल; वॉटर कॅनन सलामीने स्वागत
1

Navi Mumbai: नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय उड्डाणाला सुरुवात! अबू धाबीहून पहिले विमान दाखल; वॉटर कॅनन सलामीने स्वागत

Navi Mumbai : नवी मुंबईत ‘सांडपाणी प्रक्रिया’ धोरणाला हरताळ; पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर?
2

Navi Mumbai : नवी मुंबईत ‘सांडपाणी प्रक्रिया’ धोरणाला हरताळ; पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर?

Navi Mumbai : केवळ अधिकाऱ्यांवर कारवाई का? नवी मुंबईला २५ वर्षे लुटणारे ‘राजकीय आका’ मोकाट; मनसेचे अभिजित देसाई यांचा सवाल
3

Navi Mumbai : केवळ अधिकाऱ्यांवर कारवाई का? नवी मुंबईला २५ वर्षे लुटणारे ‘राजकीय आका’ मोकाट; मनसेचे अभिजित देसाई यांचा सवाल

Ghansoli News: घणसोलीतील सिम्प्लेक्सचा होणार क्लस्टर विकास, नागरिकांकडून ३० दिवसांत सूचना-हरकती मागविणार
4

Ghansoli News: घणसोलीतील सिम्प्लेक्सचा होणार क्लस्टर विकास, नागरिकांकडून ३० दिवसांत सूचना-हरकती मागविणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.