crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
लातूर: लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजच्या फिससाठी असलेले पैसे सिलेंडरसाठी वापरले म्हणून मुलानेच वडिलांची निघून हत्या केल्याचे समोर आले आहे. सततचा पाऊस असल्याने चुलीत जाळायला लाकूड मिळालं नाही. म्हणून गॅस सिलेंडरची पैसे खर्च केले. कॉलेजची फी सिलेंडरसाठी खर्चले म्हणून मुलानेच बापाची निर्घृणपणे हत्या केली.
एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; अपघात इतका भीषण की…
नेमकं काय घडलं?
मृतकाचे नाव देविदास पांचाळ (वय 70) असे आहे. देविदास हे अत्यंत गरीब परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. त्यांचा मुलगा चापोली येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. अलीकडेच त्याने वडिलांकडे कॉलेज फीस भरण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र सततच्या पावसामुळे घरातील जळतन भिजले होते, तसेच गॅसही संपले होते म्हणून आईने गॅस खरेदीसाठी पैसे खर्च केले. सतत होणाऱ्या पावसामुळे भाजीपाला विक्रीच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळे आर्थिक ओढाताण वाढली होती. त्यामुळे फिससाठी पैसे शिल्लक राहिले नव्हते.
आईने समजावून सांगितलं तरी…
याकारणामुळे मुलाने वडिलांशी वाद घातला. आईने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलगा काही ऐकेना. त्याने रागाच्या भरात घरातील काठी उचलून वडिलांच्या डोक्यात घातली आणि मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या देविदास पांचाळ यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, चाकूर येथे दाखल करण्यात आले. परंतु डोक्याला लागलेला मारा गंभीर असल्याने सतत रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
आरोपी मुलगा अटक
या घटनेनंतर शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकून पोलीस पाटलांना खबर दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर मुरकुटे घटनास्थळी दाखल झाले. पुढे पोलीस उपअधीक्षक रवींद्र चौधर, पोलीस निरिक्षक बालाजी भंडे तसेच लातूर येथील मोबाईल फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. सध्या आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. केवळ पोटासाठी बापाने सिलेंडरसाठी फीसचे पैसे खर्च केले म्हणून मारहाण करून हत्या केल्याने परिसरात संताप व्यक्त केला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे हिंपळनेर परिसरात शोककळा पसरली आहे.