अनेक तरुणांनी ऑनलाईन गेमिंगच्या नादात लाखो रुपये गमावल्याच्या घटना समोर आल्या आहे. आता लखनऊमधून असाच एक धक्कदायक प्रकार समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलाने वडिलांच्या खात्यातून तब्बल १३ लाख रुपये गेमिंगमध्ये उडवल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे आई वडिलांनी जाब विचारल्यानंतर त्याने आत्महत्या केली. या घटनने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ही घटना लखनौ येथे घडली
आयुष्य कोमकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांच्या धमकीनंतर आंदेकरचा मुलगा पोलीस ठाण्यात हजर
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा मुलगा हा सहावीत शिकत होता. त्याने वडिलांच्या बँक खात्यातून प्रातां १३ लाख रुपये गमावले आणि नंतर आत्महत्या केली. विद्यार्थ्याचे वडील रंगकाम करतात आणि सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांनी त्यांची जमीन विकून त्यांच्या बँक खात्यात १३ लाख रुपये जमा केले. सोमवारी जेव्हा तो त्यांच्या बँक खात्याचे पासबुक अपडेट करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना कळले की ते १३ लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात नाहीत. हे बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
त्यांनी याबाबत लगेच चौकशी केली. चौकशीत असे दिसून आले की ही मोठी रक्कम ऑनलाईन गेम फ्री फायरद्वारा खर्च करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाची चांगलीच खरडपट्टी केली. याचाच त्याला राग आला त्याने आपले आयुष्य संपवले. या घटनेने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्काच बसला आहे.
आईने अभ्यास करण्यासाठी रागावले म्हणून 18 वर्षीय नर्सिंग उचलले टोकाचे पाऊल
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आईने अभ्यास करण्यासाठी रागावले म्हणून १८ वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या घटने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करण्याऱ्या मुलीचे नाव विशाखा अनिल वक्ते असे आहे. तिने नुकताच नर्सिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश केला होता. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणानतंर रुग्णालयात कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. “इतक्या किरकोळ कारणावरून मुलगी असं टोकाचं पाऊल उचलेल, असा विचारही केला नव्हता,” असं नातेवाईकांनी सांगितलं. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.