Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणंद पोलिसांची जबरदस्त कामगिरी; बिरोबा मंदिरातील ‘या’ भयानक घटनेतील आरोपींना तासाभरात ठोकल्या बेड्या

इंदिरानगर येथील बिरोबा मंदिराचे पुजारी अनिल कोळेकर हे दुपारी मंदिरात आराम करण्यासाठी आले असता त्यांना त्याठिकाणी किरण किसन गोवेकर हा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला दिसून आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 05, 2025 | 09:17 PM
लोणंद पोलिसांची जबरदस्त कामगिरी; बिरोबा मंदिरातील ‘या’ भयानक घटनेतील आरोपींना तासाभरात ठोकल्या बेड्या
Follow Us
Follow Us:

लोणंद:  लोणंद येथील इंदिरानगर भागातील बिरोबा मंदिरात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास कोरेगाव येथील किरण किसन गोवेकर रा. कोरेगाव ता. फलटण याचा निघृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर येथील बिरोबा मंदिराचे पुजारी अनिल कोळेकर हे दुपारी मंदिरात आराम करण्यासाठी आले असता त्यांना त्याठिकाणी किरण किसन गोवेकर हा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला दिसून आला.

याबाबत त्यांनी तातडीने लोणंद पोलीसांशी संपर्क साधला असता लोणंद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आल्यानंतर मृतदेह लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी सपोनि सुशिल बी. भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि विशाल कदम, मपोउनि. ज्योती चव्हाण, पोहवा चंद्रकांत काकडे, पोकॉ. सचिन कोळेकर यांनी आरोपींची माहीती घेत संशयित आरोपी सतीश भाऊसो काळे व रोहीत शिवाजी डेंगरे या दोघांना गुन्हा घडल्यानंतर अवघ्या तासाभरात ताब्यात घेण्यात यश मिळवले. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी सुशील भोसले करत आहेत.

जेलमधून सुटलेल्या आरोपीने केली पुन्हा एक हत्या

कल्याणमध्ये तुरुंगातून सुटलेला आरोपी पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या दिशेने गेल्याची घटना घडली आहे. या आरोपीने पैशांची गरज असल्याने त्याने एका वृद्ध महिलेचा जीव घेतला आहे. व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने त्याने हे कृत्य केले आहे. पाणी मंगण्याच्या बहाण्याने हा आरोपी वृद्ध महिलेच्या घरात शिरला. त्यानंतर तीची हत्या करून दागिने चोरी केले. दरम्यान या आरोपीला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याणच्या आंबिवली परिसरात राहणाऱ्या ७४ वर्षीय रंजना पाटकर यांची हत्या करून त्यांचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. चांद उर्फ अकबर शेख (३०) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून, तो यापूर्वीही हत्या प्रकरणात दोषी आढळून आला होता. चांगली वर्तणूक असल्यामुळे त्याला काही महिन्यांपूर्वी त्याची सुटका करण्यात आली होती.

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही! जेलमधून सुटलेल्या आरोपीने केली पुन्हा एक हत्या; कल्याणमधील घटना

जेलमधून सुटल्यानंतर तो आंबिवलीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मात्र, मोमोज विक्रीसाठी व्यवसाय सुरू करायचा असल्याने पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने काही दिवस रंजना पाटकर यांच्या घराची रेकी केली. २० मार्च रोजी आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने वृद्धेच्या घरी प्रवेश केला. टीव्हीचा आवाज वाढवून त्याने आरडाओरडा ऐकू येऊ नये याची काळजी घेतली आणि नंतर महिलेचा गळा दाबून खून केला. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले मिळून सुमारे १.०५ लाखांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी मयतच्या कुटुंबाचा दुसऱ्यावरती संशय होता. त्यामुळे पोलिसांनी एक संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात हजर केले व सध्या तो कल्याण आधारवाडी जेलमध्ये आहे.

Web Title: Lonand police arrest 2 accused of committing the same murder in a temple within an hour crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 09:17 PM

Topics:  

  • crime news
  • Lonand police
  • Murder News

संबंधित बातम्या

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू
1

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर…
2

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर…

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश
3

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.