आंबिवलीत ७४ वर्षीय महिलेची हत्या (फोटो- istockphoto)
कल्याण: कल्याणमध्ये तुरुंगातून सुटलेला आरोपी पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या दिशेने गेल्याची घटना घडली आहे. या आरोपीने पैशांची गरज असल्याने त्याने एका वृद्ध महिलेचा जीव घेतला आहे. व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने त्याने हे कृत्य केले आहे. पाणी मंगण्याच्या बहाण्याने हा आरोपी वृद्ध महिलेच्या घरात शिरला. त्यानंतर तीची हत्या करून दागिने चोरी केले. दरम्यान या आरोपीला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
कल्याणच्या आंबिवली परिसरात राहणाऱ्या ७४ वर्षीय रंजना पाटकर यांची हत्या करून त्यांचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. चांद उर्फ अकबर शेख (३०) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून, तो यापूर्वीही हत्या प्रकरणात दोषी आढळून आला होता. चांगली वर्तणूक असल्यामुळे त्याला काही महिन्यांपूर्वी त्याची सुटका करण्यात आली होती.
जेलमधून सुटल्यानंतर तो आंबिवलीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मात्र, मोमोज विक्रीसाठी व्यवसाय सुरू करायचा असल्याने पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने काही दिवस रंजना पाटकर यांच्या घराची रेकी केली. २० मार्च रोजी आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने वृद्धेच्या घरी प्रवेश केला. टीव्हीचा आवाज वाढवून त्याने आरडाओरडा ऐकू येऊ नये याची काळजी घेतली आणि नंतर महिलेचा गळा दाबून खून केला. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले मिळून सुमारे १.०५ लाखांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी मयतच्या कुटुंबाचा दुसऱ्यावरती संशय होता. त्यामुळे पोलिसांनी एक संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात हजर केले व सध्या तो कल्याण आधारवाडी जेलमध्ये आहे.
मात्र, यादरम्यान पोलिसांनी परिसरात असलेल्या गुन्हेगारीवरती पाळण ठेवत 100 पेक्षा अधिक लोकांची माहिती गोळा करत पोलिसांच्या गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहितीवरून खऱ्या आरोपीचा छडा लावण्यात आला. आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. ही हत्या आणि जबरी चोरी उघडकीस आणणाऱ्या खडकपाडा पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून, या गुन्ह्यातील तपास अधिक सुरु आहे.
पत्ता विचारण्याच्या बहाणा करून पुण्यात चोरी
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. मध्यभागात चोरट्यांनी एका सराफ बाजारातील कारागिराला पत्ता विचारण्याच्या बहाणा करून त्याच्या हातातील २० लाखांचे दागिने असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवार पेठेतील मोती चौक परिसरात ही घटना घडली आहे.
पत्ता विचारण्याच्या बहाणा करून पुण्यात चोरी; तब्बल 20 लाखांचे दागिने लंपास
याप्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चिरनजीत अंबिका बाग (वय २३, सध्या रा. दगडी नागाेबा मंदिराजवळ, रविवार पेठ, मूळ रा. पश्चिम बंगाल) याने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.