Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तडीपार गुन्हेगारासह कोयतेधाऱ्यांना ठोेकल्या बेड्या; लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई

लोणी काळभोर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाई करून तडीपार गुन्हेगारासह कोयतेधारी टोळक्याला जेरबंद केले आहे. पोलिसांनी दोन कारवाईत चौघांना अटक करून, ५ कोयते, दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 07, 2025 | 07:29 PM
तडीपार गुन्हेगारासह कोयतेधाऱ्यांना ठोेकल्या बेड्या; लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई

तडीपार गुन्हेगारासह कोयतेधाऱ्यांना ठोेकल्या बेड्या; लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली
  • लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई
  • तडीपार गुन्हेगारासह कोयतेधाऱ्यांना ठोेकल्या बेड्या
पुणे : लोणी काळभोर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाई करून तडीपार गुन्हेगारासह कोयतेधारी टोळक्याला जेरबंद केले आहे. गुन्हेगार शहर व जिल्ह्यातून तडीपार केल्यानंतर देखील आदेशाचा भंग करून पुन्हा शहरात येत धारधार कोयता घेऊन फिरत होता. तर दुसऱ्या कारवाईत घातपाताचा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या कोयतेधारी तिघांना जेरबंद केले आहे. पोलिसांनी दोन कारवाईत चौघांना अटक करून, ५ कोयते, दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे.

याप्रकरणात पोलिसांनी पहिल्या कारवाईत कोयते घेऊन फिरणाऱ्या प्रकाश काळु कांबळे (वय २०, रा. कात्रज), मयुरेश्वर दत्तात्रय इटकर (वय १८) व अक्षय रविंद्र चव्हाण (वय १८, रा. कात्रज) यांना तसेच तडीपार गुन्हेगार रोहित महादेव पाटील (वय २१, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) याला अटक केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

पुणे शहरातील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर उपनगर व शहरात नव्याने दाखल झालेला लोणी काळभोर पोलिस ठाण्याचा भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सराईतांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. यादरम्यान, लोणी काळभोर पोलिसांना काहीजन घोरपडे वस्ती भागात तिघे एका दुचाकीवरून कोयते घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी प्रकाश, मयुरेश्वर व अक्षय या तिघांना पकडले. त्यांच्याकडून चार कोयते, दुचाकी आणि मोबाईल जप्त केले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून मोठा घातपात करण्याची तयारी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

तडीपार गुन्हेगार कोयत्यासह जेरबंद

लोणी काळभोर पोलिसांनी या कारवाईसोबतच तडीपार असताना देखील पुन्हा आदेशाचा भंग करून फिरणाऱ्या रोहित पाटील याला पकडले आहे. त्याची झडती घेतली असता त त्याच्या शस्त्र आढळून आले. तो कशासाठी हद्दीत आला होता, यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

Web Title: Loni kalbhor police have arrested 4 people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 07:29 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
1

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
2

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

केज तालुक्यात खळबळ! प्रियकराच्या मुलानेच केली महिलेची हत्या; मृतदेह पुरला अन्…
3

केज तालुक्यात खळबळ! प्रियकराच्या मुलानेच केली महिलेची हत्या; मृतदेह पुरला अन्…

मोशीत महिलेचा निर्घृण खून, चेहरा विद्रूप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी २४ तासांत उकलले खुनाचे गूढ
4

मोशीत महिलेचा निर्घृण खून, चेहरा विद्रूप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी २४ तासांत उकलले खुनाचे गूढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.