मेकअप (Make Up) काय करू शकत नाही. याचे जिवंत उदाहरण चीनमधून (China) समोर आले आहे. येथे एका व्यक्तीची प्रेमात फसवणूक (Cheating In Love) झाली आहे. गुओ (Guo) असे या ३१ वर्षीय व्यक्तीचे नाव असून तो चीनच्या सेंट्रल हेनान (Central Henan of China) प्रांताचा रहिवासी आहे. गुओचा दावा आहे की, एका महिलेने त्याची फसवणूक (Love Fraud) केली. महिलेने तिचे वय ३० वर्षे सांगितले होते मात्र तिचे वय ४४ वर्षे आहे. त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही महिला लवकरच आजी होणार आहे. हे प्रकरण सध्या चीनच्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, दोघेही गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भेटले होते. त्यानंतर महिलेने तिची जन्मतारीख १९९२ सांगितली. बराच वेळ एकत्र घालवल्यानंतर तो त्या महिलेच्या प्रेमात पडल्याचे गुओने सांगितले. त्याने तिला त्याच्या कुटुंबाला भेटायला आणले, जिथे ती दोन आठवडे राहिली. गुओ म्हणाले, ‘मला वाटले माझे लग्न निश्चित झाले आहे. मला विश्वास होता की मला माझा जीवनसाथी सापडला आहे आणि मला माझे उर्वरित आयुष्य तिच्यासोबत घालवायचे आहे. मात्र, एक फोन आल्याने गुओच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
[read_also content=”कर्जाचा सापळा, तीन नराधम आणि कब्रस्तानात पुरलेला मृतदेह… हे रहस्य झालं उघड अन् पोलीसही चक्रावून गेले https://www.navarashtra.com/crime/delhi-crime-mangolpuri-woman-murder-funeral-graveyard-burial-disclosure-accused-police-arrested-nrvb-362130.html”]
गुओला त्याच्या आईने गेल्या वर्षी ९ डिसेंबरला फोन करून आपल्या मैत्रिणीची हकीकत सांगितली, जी ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर त्याने लगेचच नाते संपवले. गुओ म्हणाले, ‘माझ्या आईने तिचे खरे वय सांगितले आणि महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचे सांगितले. तिच्या मुलाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्याची पत्नी लवकरच बाळाला जन्म देणार आहे. तुम्ही बघू शकता, जी बाई आजी बनणार आहे ती माझ्याशी रिलेशनशिपमध्ये आहे.
गुओ म्हणाले- याचा अर्थ माझ्या वयात मला आजोबा होण्यास भाग पाडले जात होते. हे किती लज्जास्पद आहे. मला असे वाटते की मी माझ्या गावकऱ्यांना तोंड दाखवू शकलो नाही कारण त्यांना ही फसवणूक माहित आहे.
गुओने सांगितले की त्याची मैत्रीण तरुण दिसते आणि तसेच कपडेही घालते. जेव्हा ती मेकअप करते तेव्हा तिचे खरे वय कोणीही सांगू शकत नाही. त्याने सांगितले की त्याच्या आईने महिलेशी बोलून तिच्या घराबद्दल विचारले होते. आईचे नातेवाईकही ती राहत असलेल्या समाजात राहतात, त्यांनी मैत्रिणीबद्दल माहिती गोळा केली.
[read_also content=”घराचा होणार होता लिलाव, आता या पठ्ठ्यानं घेतली 50 लाखांची ऑडी, 10 मिनिटांचा व्हिडिओ 2 कोटी वेळा पाहिला https://www.navarashtra.com/viral/bihari-viral-boy-house-was-going-to-be-auctioned-now-this-letter-has-bought-an-audi-worth-50-lakhs-10-minute-video-has-been-viewed-2-crore-times-nrvb-362145.html”]
गुओने सांगितले की, आपली केवळ प्रेमात फसवणूक झाली नाही तर १.२१ लाख रुपये लुटले गेले. ती वेगवेगळ्या बहाण्याने पैसे मागायची. त्याने पोलिसांना विचारणा केली असता महिलेची जन्मतारीख १९७८ असल्याचे कळले. मात्र, पोलिसांनी आरोपी महिलेवर काही कारवाई केली की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.