सर्वच महिला कामानिमित्त बाहेर जाताना किंवा कोणत्याही कार्यक्रमात बाहेर जाताना लिपस्टिक लावतात. लिपस्टिक लावल्याशिवाय मेकअप पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. बाजारात लिप्स्टिकचे अनेक वेगवेगळे ब्रँड उपलब्ध आहेत. महिलांसाठी सौंदर्याची ओळख म्हणजे लिपस्टिक. लाल, गुलाबी, लाईट पिंक इत्यादी ठराविक रंगाच्या लिपस्टिक कायमच लावल्या जातात. पण लिपस्टिकमध्ये असलेली काही रसायन त्वचेसाठी आणि संपूर्ण शरीरासाठी अतिशय हानिकारक ठरतात. यामध्ये लीड, क्रोमियम, कॅडमियम इत्यादी अनेक घटक असतात. यामुळे कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिपस्टिक लावल्यामुळे खरंच कॅन्सर होतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
Lipstick and Cancer: लिपस्टिक लावल्यामुळे खरोखरच कॅन्सर होतो का? जाणून घ्या यामागील वैद्यकीय कारण

लिपस्टिक लावल्यामुळे कॅन्सर होत नाही, पण सतत लिपस्टिक लावल्यामुळे शरीराला आणि ओठाला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दिवसभरातून एकदाच लिपस्टिक लावावी.

लिपस्टिकमध्ये असलेले काही हानिकारक घटक कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात. काही लिपस्टिकमध्ये लीड आढळून आले आहे. यामुळे त्वचेचा कॅन्सर किंवा इतर आजारांची लागण होण्याची शक्यता असते.

लिपस्टिकमध्ये क्रोमियम आढळून येते, जे पोटाच्या ट्युमरशी संबंधित आहे. जास्तीत जास्त वापर केल्यामुळे पोटाला किंवा आतड्यांच्या आरोग्याला इजा पोहचू शकते.

लिपस्टिकमध्ये असलेले कॅडमियम फुफ्फुस कर्करोग किंवा किडनी समस्या वाढवतात. केमिकल युक्त लिपस्टिक कायमच वापरल्यास शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो.

भारतीय डॉक्टरांच्या मते, लिपस्टिकमध्ये असलेले घटक कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे कायमच नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेल्या प्रॉडक्टची निवड करावी.






