Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

24 तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, महिलेला ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या २४ तासांच्या आत घरफोडीचा एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 26, 2026 | 03:11 PM
24 तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, महिलेला ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त

24 तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, महिलेला ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ गातला असून, दररोज चोरटे नागरिकांचे घरे फडून चोऱ्या करत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी घटना समोर आली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या २४ तासांच्या आत घरफोडीचा एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका महिला आरोपीला अटक केली असून, तिच्याकडून चोरीला गेलेले १०० टक्के मुद्देमाल म्हणजेच १३ लाख ८७ हजार रुपये किमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२६ रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घरातील कपाटातून १० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३३१(१) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता, त्यामध्ये एका महिलेचा सहभाग असल्याचे दिसून आले.

तांत्रिक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सारिका संतोष भुजबळ (वय ३८, रा. तळेगाव दाभाडे, जि. पुणे) हिच्यावर संशय व्यक्त केला. महिला पोलिसांच्या मदतीने तिची कसून चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी महिला ही फिर्यादीच्या परिचयाची होती आणि तिला घरातील दागिन्यांबाबत पूर्ण माहिती होती. तिने बनावट चावीचा वापर करून घरात प्रवेश केला आणि चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, उपनिरीक्षक भारत करे, किशोर सांगळे आणि त्यांच्या पथकाने केली.

हे सुद्धा वाचा : ‘बुकट्यूबर’मुळे तरुणाई पुन्हा वाचनाकडे आकर्षित; युट्यूबच्या माध्यमातून पुस्तकांचे परीक्षण

Web Title: Mahalunge midc police have uncovered a major case of house burglary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Theft Cases

संबंधित बातम्या

Indapur Crime : इंदापूर तालुक्यात गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले
1

Indapur Crime : इंदापूर तालुक्यात गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले

Crime News : टोळक्याकडून तलवारीने अन् लोखंडी रॉडने तरुणावर हल्ला; कारण काय तर…
2

Crime News : टोळक्याकडून तलवारीने अन् लोखंडी रॉडने तरुणावर हल्ला; कारण काय तर…

लोणावळ्यातील बंगल्यात सुरु असलेल्या ‘हाय-प्रोफाइल’ पार्टीवर छापा; तब्बल 18 जणांवर गुन्हा दाखल
3

लोणावळ्यातील बंगल्यात सुरु असलेल्या ‘हाय-प्रोफाइल’ पार्टीवर छापा; तब्बल 18 जणांवर गुन्हा दाखल

व्यावसायिकांचे धाबे दणाणले! सिंधुदुर्गमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई सुरुच; लाखोंचा मुद्देमाल जप्त
4

व्यावसायिकांचे धाबे दणाणले! सिंधुदुर्गमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई सुरुच; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.