Crime News Live Updates
मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेत मेघवाडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने प्रेयसीच्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मुलीच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकला. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून नराधमाने व्हिडिओ शूट केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. या घटनेने मुंबई एकदा पुन्हा हादरलीय. या घटनेनंतर 24 वर्षीय तरुणासह त्याच्या प्रेयसीला मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
23 Jun 2025 06:33 PM (IST)
विमाननगर परिसरात रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मन्सूर अन्वर आलम (वय ५४, रा. ससून क्वार्टर, सोमवार पेठ) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत मन्सूर आलम यांचा मुलगा मोहम्मद रिहान मन्सूर आलम (वय २६) याने विमाननगर पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी रिक्षाचालकावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. मन्सूर आलम हे शनिवारी (२१ जून) रात्री सव्वाआठच्या सुमारास विमननगर भागातून निघाले होते. त्यावेळी सिंबायोसिस महाविद्यालय प्रवेशद्वार क्रमांक एकसमोर भरधाव रिक्षाने मन्सूर यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मन्सूर यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालक जालिंदर बबन शेळके (वय ५७, रा. कळस, आळंदी रस्ता) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार धेंडे तपास करत आहेत.
23 Jun 2025 06:32 PM (IST)
सिंहगड रोडवरील वडगाव उड्डाणपुलावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात त्याच्यासोबतचा दुचाकीस्वार तरुण जखमी झाला आहे. तसेच त्याचं भरधाव ट्रकने उड्डाणपुलावरुन निघालेल्या आणखी दोन कारला धडक दिली आहे. अपघातात दोन कारचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. किरण पवार (वय २५, रा. श्रमसाफल्य कॉलनी, कर्वेनगर) असे मृत्यू झलेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. तर दुचाकीस्वार यश जयप्रकाश किरदत्त (वय २५, रा. श्रमसाफल्य कॉलनी, कर्वेनगर) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रकचालक महंतेश श्रीकांत अंदोडगी (वय ३७, रा. गोलसर, ता. इंडी, जि. विजयपुर, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत यश किरदत्त याने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे.
23 Jun 2025 06:11 PM (IST)
उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील रसूलाबाद शहरात एका तासाच्या आत वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. वडील आणि मुलाचे मृतदेह पाहून पत्नी शिवानी बेशुद्ध पडली. मृतांची ओळख विष्णू कुमार जयस्वाल (३२) आणि त्यांचा ५ वर्षांचा मुलगा आयांश अशी झाली आहे. संपूर्ण प्रकरण सफीपूरच्या रसुलाबाद शहरातील सुभाष नगर येथील आहे. रविवारी रात्री १० वाजता पंख्याच्या तुटलेल्या तारेच्या संपर्कात येऊन एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची बातमी मिळताच दुचाकीवरून घरी परतणाऱ्या वडिलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.
23 Jun 2025 04:13 PM (IST)
इचलकरंजी येथील शाहू कॉर्नर परिसरात एका हॉटेलच्या मागे असलेल्या सुवर्णयुग कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, ११ हजारांची रोकड, १ लाख ६० हजारच्या तीन दुचाकी, १५ हजारांचे ६ मोबाईल व २० हजारांचे जुगाराचे साहित्य असा २ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार अमित दिपक कदम यांनी फिर्याद दिली आहे.
23 Jun 2025 03:06 PM (IST)
पुण्यनगरीत 'हक्काच घर’ असाव हे प्रत्येकाचच स्वप्न असतं. घराचे हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी गेल्या काही वर्षात गल्लो-गल्लीत 'बिल्डर' ह्या गोंडस नावाने एक जमात निर्माण झाली अन् जिकडे-पहावे तिकडे उंच-उंच इमारतीचे इमले पाहिला मिळू लागले आहेत. पण, असे असले तरी अनेकांचे स्वप्न बिल्डरांमुळे भंग होत असल्याचे पाहायला मिळत असून, ठरलेल्या अटी व नियमाने पालन न करता कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच 'महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क कायद्याअंतर्गत' (मोफा) गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या आकरा वर्षात तब्बल १३१ बिल्डरांवर मोफानुसार गुन्हे नोंदविले असून, यामध्ये नामांकित बिल्डरांचा देखील समावेश आहे.
23 Jun 2025 02:56 PM (IST)
कल्याण पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवलीत बांगलादेशी नागरीकांची शोध मोहिम पोलिसांनी सुरु केली आहे. कल्याण डोंबिवलीत आत्तापर्यंत अनेक बांगलादेशी सापडले आहेत. कल्याण च्या पोलिसांनी दहा बांगलादेशी नागरीकांना अटक करुन कारवाई केली आहे. कल्याणच्या स्टेशन परिसरात महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी विकास मडके यांच्या पथकाने एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले. या महिलेकडे बांगलादेशाचे आधार कार्ड सापडले आहे. पाच वर्षापूर्वी निपू अख्रतर नावाची माहिला भारतात आली. ती मुंबईतील कामाठीपुरा येथे राहते. तिला दहा वर्षाचा मुलगा आहे. तो बांगलादेशात राहतो. निपू याची आई त्या मुलाला सांभाळते. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
23 Jun 2025 01:25 PM (IST)
शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास चांगला नफा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेची ४० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे.
23 Jun 2025 12:40 PM (IST)
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनने चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. सिगारेट उधारीवर न दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने महिलेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अखेर ५ दिवसापूर्वी घडलेल्या खुनाचा उलगडा झालं आहे. सविस्तर बातमी
23 Jun 2025 12:30 PM (IST)
बिहारमधील नवादा जिल्ह्यात समय गावातील एका घटनेने खळबळ उडाली आहे. एक महिला तिच्या तीन मुलांना सोडून तिच्या प्रियकरासोबत पळ काढला. महिलेने घरात ठेवलेले लाखो रुपयांचे जमिनीचे कागदपत्र आणि दागिनेही पळवून नेले. तिच्या पतीने मुफस्सिल पोलिस ठाण्यात यासंधर्भात तक्रार दाखल केली आहे. अर्ज मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आणि एफआयआर नोंदवला आहे.
23 Jun 2025 12:25 PM (IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत त्याच्या वागण्यामुळे चर्चेत होता. पंत चेंडू बदलू इच्छित होता, पण जेव्हा ते घडले नाही तेव्हा तो पंचांशी भांडला. भारतीय संघाच्या उपकर्णधाराने बराच वेळ पंचांशी वाद घातला, त्यानंतर पंत रागावला आणि त्याने पंचांसमोर चेंडू जमिनीवर फेकला. पंतच्या या वागण्यामुळे त्याच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. आयसीसीच्या दोन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल विकेटकीपर फलंदाजाला कठोर शिक्षा होऊ शकते.
23 Jun 2025 12:20 PM (IST)
उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर केवळ काही दिवसातच नवरा बायकोमध्ये वाद होण्याला सुरवात झाली. वाद विकोपाला गेला आणि पत्नी माहेरी निघून गेली. गेली त गेली जातांना घरातील भांडीकुंडी सगळाच घेऊन गेली. सामान परत आण्यासाठी नवरा थेट 10-12 जणांना घेऊन पत्नीच्या माहेरी पोहोचला. संतप्त नवऱ्याने सासू, सासरे आणि पत्नीच्या भावावर लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी थेट प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील भरतनगर परिसरात घडली. याप्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सविस्तर बातमी
23 Jun 2025 12:17 PM (IST)
वैष्णवी हगवणेप्रकरणानंतर देखील पुण्यासारख्या शहरात विवाहितांचा छळ आणि छळातून आत्महत्या घडत असल्याचे दिसत असून, गेल्या आठवड्यात आंबेगावात 'मयुरी'ने ६ वर्षांच्या चिमुकल्यासह ६ मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाचं आता काळेपडळमध्ये सासूकडून हुंड्यासाठी तसेच सोने व पैशांसाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षीत विवाहितेने सिलींग फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सासूविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिपीका प्रमोद जाधव (वय २९, रा. हांडेवाडी रोड, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी सासू द्वारका जाधव हिच्याविरूद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपीकाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घडला आहे.
23 Jun 2025 12:10 PM (IST)
कमी मार्क पडल्याच्या रागातून शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या वडिलाने आपल्या पोटच्या मुलीला लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण केली. ही मारहाण एवढी बेदम होती की तिने आपला जीवाचं सोडला. ही घटना सांगली जिल्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे घडली आहे. याप्रकरणी मृतक मुलीच्या पित्यास अटक करण्यात आली आहे. सविस्तर बातमी
23 Jun 2025 11:55 AM (IST)
बीड तालुक्यातून एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. 6 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादी छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांचे स्वीय सहाय्यक नयन शेजूळ यांच्यावर करण्यात आलं आहे. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सविस्तर बातमी
23 Jun 2025 11:54 AM (IST)
पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका परप्रांतीय कामगार युवकाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. आत्म्ह्तायेपूर्वी या युवकाने एक व्हिडीओ देखल बनवला होता.हा व्हिडीओ वायरल झालं असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. मृतकाचे नाव संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय 18) असे आहे. तो पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी येथील देहूरोडमध्ये कन्स्ट्रक्शन इमारतीवर कामाला होता.
23 Jun 2025 11:40 AM (IST)
राज्यात गुन्हेगारी वाढली असून, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रहिवाशी इमारतीच्या पार्किंगसमोर लावलेला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून वादविवाद झाल्यानंतर रिक्षा चालकाने तरुणाच्या पोटात तीक्ष्ण हत्यार घुपसून खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या मानेवर व हातावर देखील वार केल्याने तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात रिक्षाचालक सोमनाथ हनुमंत पवार (वय ३३, रा. शिवणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संदीप देसाई (वय ३२) यांनी तक्रार दिली आहे. या हल्यात संदीप गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री साडे आकराच्या सुमारास घडली.