चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनने चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. सिगारेट उधारीवर न दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने महिलेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अखेर ५ दिवसापूर्वी घडलेल्या खुनाचा उलगडा झालं आहे.
भांड्याकुंड्यांसह बायको गेली घर सोडून, टोळक्यासह नवरा लोखंडी रॉड घेऊन घुसला घरात अन्….
नेमकं काय घडलं?
चंद्रपूर शहरातील राजुरा येथील रमाबाई नगर येथे १५ जून रोजी एका महिलेचा खून झाला होता. आता पाच दिवसांनी या खुनाचा उलगडा झाला असून संपूर्ण शहर हादरले आहे. हा खून सिगारेट न दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने धारदार शास्त्राने वार करत महिलेचा खून झाल्याचं समोर आला आहे. कविता रायपुरे (53) असे मृत महिलेचे नाव आहे.
कविता रायपुरे यांचे राजुरा येथील रमाबाई नगर किराणा दुकान होते. घटनेच्या दिवशी एक अल्पवयीन मुलगा त्यांच्या दुकानात आला होता. त्या मुलाने महिलेकडे सिगारेट उधारीवर मागितली. मुलाकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी सिगारेट देण्यास नकार दिला. याचा राग अल्पवयीन मुलाने मनात ठेवून रात्री १२ ते १च्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहत तो सुरक्षा भिंतीवरून उडी मारत आत शिरला. घरात शिरून त्याने धारदार शस्त्राने वार करत कविता रायपुरे या महिलेची हत्या केली. महिलेला तिथेच सोडून आरोपी मुलगा फरार झाला.
या घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून मोबाईल लोकेशनच्या मदतीने आरोपी तरुणास बाहेरगावातून ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेच्या पाच दिवसानंतर तपासात पोलिसांना यश आले आहे. अल्पवयीन आरोपीला राजुरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपी विरोधात कलम 332 (ब ), 103 (1) या कलमान अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी अनेक ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि 40 हून अधिक संशयितांची चौकशी केली. चौकशीदरम्यान, मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आणि सिगारेटच्या वादामुळे त्याचा राग आला असे सांगितले. त्याच्या ताब्यातून खून करण्यासाठी वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
‘रोज रात्री येतो अन् सकाळी जातो’, घरमालकाने फोन करून सांगितलं, घरी येऊन पाहतो तर….