नुकताच नीटचा निकाल लागला. बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत अनेकांना चांगले गुण तर अनेकांना कमी मार्क पडले. कमी मार्क पडल्याच्या रागातून शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या वडिलाने आपल्या पोटच्या मुलीला लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण केली. ही मारहाण एवढी बेदम होती की तिने आपला जीवाचं सोडला. ही घटना सांगली जिल्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे घडली आहे. याप्रकरणी मृतक मुलीच्या पित्यास अटक करण्यात आली आहे.
आई वडील….; आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ नंतर तरुणाने संपवले जीवन
नेमकं काय आहे प्रकरण?
मृतकाचे नाव साधना धोंडीराम भोसले असे आहे. बारावीत शिकणाऱ्या साधनाला नीट परीक्षेत कमी गुण मिळाले? असे विचारात तिच्या वडिलांनी लाकडी खुंट्याने मारहाण केली. या मारहाणीमुळे मुलीचा मृत्यू झाला. माध्यमिक शिक्षण संस्थेत मुख्याद्यापक म्हणून साधनाचे वडील कार्यरत आहेत. बारावीच्या चाचणी परिषेत साधनाला कमी गुण मिळले. हे कळताच धोंडीराम भोसले प्रचंड संतापले. बारावीतील चाचणी परीक्षेत कमी गुण कसे पडले? असे विचारात धोंडीराम यांनी रागाच्या भारत साधनाला लाकडी खुट्याने मारहाण केली. ता मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली. मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाला. हा प्रकार शुक्रवारी रात्री 9.30च्या सुमारास घडला. याबाबती साधनाची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर रविवारी वडील धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली आहे.
साधना भोसले ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. साधना ही आपटपाडीमधील विद्यालयात राहत होती. दोन दिवसापूर्वी ती घरी नेलकरंजी येथे गेली होती. तिचा नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले होते. साधनाचे वडील मुख्याद्यापक धोंडीराम भोसले हे कमी गन मिळाल्यामुळे संतापले होते. नीट परीक्षेत कमी गुण मिळाले? असे विचारात तिचं वडिलांनी तिला जात्याच्या लोखंडी खुट्याने रात्री मारहाण केली. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसऱ्या दिवशी सकाळी ते योग्य दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. घरी आल्यानंतर साधनाच्या वडिलांना ती बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिला उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. साधना ही हुशार होती. तिला दहावीमध्ये 95 टक्के गुण मिळाले होते. तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. परंतु डॉक्टर बनण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पित्यास अटक केली आहे.