• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Maharashtra Crime News In Marathi Live Updates 6

Crime News Updates : पुण्यात भरधाव कारने तरुणीला चिरडले

Crime news in Marathi: आज 14 जून 2025 रोजी महाराष्ट्रातील, देश आणि विदेशातील गुन्हेगारी संदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 14, 2025 | 06:29 PM
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. माजी नगरसेविकेच्या मुलीचा किरकोळ वाद तरुणांशी झाला. त्यामुळे माजी नगरसेविकेच्या सामर्थकांनी या तरुणावर तलवारीने हल्ला केला. तरुणावर वार करणाऱ्या नगरसेविकेच्या समर्थकांना देखील जमावाने चोप दिला. त्यानंतर माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

The liveblog has ended.
  • 14 Jun 2025 06:26 PM (IST)

    14 Jun 2025 06:26 PM (IST)

    अवैध गोमांस विक्री, मशिदींवरील भोंग्या विरोधात मढीचे सरपंच आक्रमक

    जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलखाने बंद करावेत, मस्जिदींवरील भोंगे तात्काळ हटवावेत आणि इतर धार्मिक मागण्यांसाठी मढी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय मरकड येत्या सोमवारपासून साधू-संत आणि हिंदुत्ववादी संघटनांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. प्रशासनाने वारंवार स्मरणपत्र देऊनही कारवाई न केल्यामुळे त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तसेच गोवंशीय मांस आढळलेल्या पोलिस स्टेशनमधील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

    सविस्तर वाचा 

  • 14 Jun 2025 05:49 PM (IST)

    14 Jun 2025 05:49 PM (IST)

    एका शेअरवर 210 रुपयांचा लाभांश! गुंतवणूकदार होतील मालामाल

    बजाज ऑटो लिमिटेडने प्रति शेअर २१० रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने २० जून २०२५ ही या लाभांशाची रेकॉर्ड डेट म्हणून घोषित केली आहे. म्हणजेच, या दिवशी कंपनीचे शेअर्स धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर २१० रुपये नफा मिळेल.

  • 14 Jun 2025 05:46 PM (IST)

    14 Jun 2025 05:46 PM (IST)

    मुंबईत भीषण अपघात, डंपरने तिघांना चिरडले

    गेल्याच आठवड्यात लोकल रेल्वेतून अपघात झाल्याने 4 प्रवाशांचा मत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ घडली होती. त्यामुळे, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यातच, आता मुंबईतील गोवंडी शिवाजी नगर भागात एका डंपर चालकाने 3 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना काही वेळापूर्वी घडली आहे. या भीषण अपघातात तिन्ही प्रवशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर स्थानिक जमावाने संताप व्यक्त करत डंपरचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

  • 14 Jun 2025 05:01 PM (IST)

    14 Jun 2025 05:01 PM (IST)

    बांगलादेच्या कर्णधारपदी Mehdi Hassan ची नियुक्ती

    अष्टपैलू मेहदी हसन मिराजची एका वर्षासाठी बांगलादेशच्या एकदिवसीय कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत तो पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करेल. मेहदी नझमुल हुसेन शांतो यांच्याकडून एकदिवसीय संघाची सूत्रे स्वीकारेल जो कसोटी कर्णधार राहील. लिटन दास टी-२० मध्ये बांगलादेशचे नेतृत्व करत राहील.

  • 14 Jun 2025 04:00 PM (IST)

    14 Jun 2025 04:00 PM (IST)

    डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत घोषित केलं

    उल्हासनगरमधील शिवनेरी हॉस्पिटलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिमान तायडे (वय 65) या जिवंत असलेल्या व्यक्तीस मृत घोषित करून डॉक्टरांनी चक्क त्यांना डेथ सर्टिफिकेट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

  • 14 Jun 2025 02:58 PM (IST)

    14 Jun 2025 02:58 PM (IST)

    SBI ने दिला गुंतवणूकदारांना मोठा धक्का...

    देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने FD गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. SBI ने त्यांच्या विशेष FD “अमृत वृत्ती” योजनेवरील व्याजदर कमी केला आहे, तर इतर नियमित मुदत ठेवींचे दर अपरिवर्तित ठेवले आहेत. अमृत वृत्ती एफडीसाठी सुधारित दर १५ जून २०२५ पासून लागू होतील. याचा अर्थ आता गुंतवणूकदारांना या योजनेअंतर्गत ठेवींवर पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळेल. तथापि, SBI ने इतर नियमित FD व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 14 Jun 2025 02:35 PM (IST)

    14 Jun 2025 02:35 PM (IST)

    मुंबई हादरली! नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडसोबत गेली, विरोध करणाऱ्या बापालाही संपवलं

    मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. एका ३७ वर्षीय तरुणी ने आपल्याच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने हा काटा काढला. तरुणीच्या वडिलांनाही अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या कारणातून हत्या केल्याचं समोर आला आहे. ३७ वर्षीय तरुणीचे नाव सोनाली बैत असे आहे तर तिच्या प्रियकराचे नाव महेश पांडे (२७) असे आहे. या दोघांवर अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. सविस्तर बातमी

  • 14 Jun 2025 01:22 PM (IST)

    14 Jun 2025 01:22 PM (IST)

    रस्ता क्रॉस करताना महिला पाण्यात वाहून गेली

    पुणे शहरात गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात पाण्यातून रस्ता क्रॉस करताना नाल्याचा अंदाज न आल्याने ज्येष्ठ महिला नाल्यात पडून वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवले ब्रिजजवळ ही घटना घडली असून, सायंकाळी उशिरा वारजे परिसरात तिचा मृतदेह आढळून आला आहे. अग्निशमन दल तसेच पोलिसांच्या पथकांनी तिचा शोध घेतला. शोभा मनोहर महिमाने (वय ६४, रा. फुरसुंगी) असे वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणाची नोंद भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

  • 14 Jun 2025 12:59 PM (IST)

    14 Jun 2025 12:59 PM (IST)

    भरधाव कारने तरुणीला चिरडले

    बेदरक व निष्काळजी ट्रक चालकामुळे गंगाधाम चौकात दुचाकीस्वार सासऱ्यांना व सूनेला चिरडल्याची घटना ताजी असताना आणखी एक अशीच घटना घडली असून, बेदरक आणि निष्काळजी टुरिस्ट कार चालकाने फुटपाथवरून पायी निघालेल्या महाविद्यालयीन तरुणीला धडक दिली आहे. यात तरुणीचा जागीचं मृत्यू झाला आहे. कात्रजमधील सुखसागरनगरमध्ये भरदुपारी ही घटना घडली असून, कार चालवण्याचे मित्राकडून शिक्षण घेताना ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांचा आहे.

  • 14 Jun 2025 12:55 PM (IST)

    14 Jun 2025 12:55 PM (IST)

    मिरा-भाईंदरमध्ये गुन्हेगाराकडून दोन अग्नीशस्त्र जप्त; खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई

     

    मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत एका तरुणाकडून दोन अग्नीशस्त्र, पाच जिवंत काडतुसे, दोन रिकाम्या मॅगझिन्स आणि मोबाईलसह एकूण 89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अहमदाबाद-मुंबई महामार्गावर वसोंचा गाव येथील वाटिका हॉटेलसमोर करण्यात आली.

  • 14 Jun 2025 12:00 PM (IST)

    14 Jun 2025 12:00 PM (IST)

    एकाच मुस्लिम कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

    कुटुंबातील लोकांनी प्रशासन आणि माध्यमांवर आपला राग व्यक्त केला. मृतासाठी मुंबईहून अहमदाबादला पोहोचलेले मुस्लिम कुटुंब संतप्त आहे. ते म्हणतात की आम्ही २ दिवसांपासून अहमदाबादमध्ये आहोत पण आम्हाला अद्याप मृतदेहाची ओळख पटवता आलेली नाही. जावेद अली त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह मुंबईहून लंडनला जाणाऱ्या विमानाने प्रवास करत होते पण गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर त्यांची विमान प्रतीक्षा यादीत होती. या घटनेत जावेद अलीसोबत त्यांची पत्नी आणि मुलांचाही मृत्यू झाला.

  • 14 Jun 2025 11:27 AM (IST)

    14 Jun 2025 11:27 AM (IST)

    धारदार शस्त्राने प्रेयसीवर वार

    मुंबईच्या मीरारोड कनकिया येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हाडा वसाहतीत एका महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या झालेल्या महिलेचं नाव करिश्मा असे आहे. तिच्या गळ्यावर धारधार शस्त्राने खोल वार करून हत्या करण्यात आली. ही हत्या तिच्याच प्रियकराने केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हत्या झालेल्या महिलेचं नाव करिश्मा (पूर्ण नाव गोपनीय) तर आरोपीचा नाव शमशुद्दीन मोहम्मद खुर्शीद हसीफ (वय 24, व्यवसाय,शेफ) असे आहे.

  • 14 Jun 2025 11:26 AM (IST)

    14 Jun 2025 11:26 AM (IST)

    कर्जाच्या ओझ्याने युवा शेतकऱ्याची आत्महत्या

    कर्जबाजारीपणा, नापिकी आणि कुटुंबावरची जबाबदारी या सगळ्यांचा मानसिक ताण झेलताना एका तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं. या धक्कादायक घटनेचा परिणाम इतका गंभीर ठरला की त्याच्या वडिलांचा काही दिवसांतच मृत्यू झाला आणि आईलाही हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. एकाच कुटुंबावर आलेल्या या दुहेरी आघातामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, ही घटना शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचं विदारक दर्शन घडवणारी ठरली आहे. हि घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्याचे सावरगाव नसरत येथे घडली आहे.

  • 14 Jun 2025 11:25 AM (IST)

    14 Jun 2025 11:25 AM (IST)

    धारदार विळ्याने केले पत्नीवर वार

    कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील सावे गावात एक धक्कदायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशी घरगुती किरकोळ वादातून पतीने पत्नीवर धारधार विळ्याने वार केले. यानंतर त्याने स्वतःच गळा चिरून आत्महत्या केली. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. मृतकाचे नाव कृष्णा शिवाजी झेंडे (वय 47) आणि राधिका झेंडे असे आहेत.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates 6

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Maharashtra Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
1

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
2

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
3

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
4

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.