मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. एका ३७ वर्षीय तरुणी ने आपल्याच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने हा काटा काढला. तरुणीच्या वडिलांनाही अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या कारणातून हत्या केल्याचं समोर आला आहे. ३७ वर्षीय तरुणीचे नाव सोनाली बैत असे आहे तर तिच्या प्रियकराचे नाव महेश पांडे (२७) असे आहे. या दोघांवर अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
Bhayander Crime News : खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई; अवैध शस्त्रसाठा केला जप्त
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली हीच २००८ मध्ये अमोल बैत या तरुणाशी लग्न झालं होतं. लग्नानंतर सोनालीला दोन मुलेही आहेत. २०२२ला ती तिच्या पतीपासून वेगळी झाली. तिने तिच्या प्रियकर महेश पांडे सोबत लिविंग रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. परंतु ही बाब सोनालीच्या कुटुंबियांना मान्य नव्हती आणि तिच्या वडिलांचा प्रचंड विरोध होता. या कारणावरून बापलेकींमध्ये वारंवार वाद होत होते. सोनालीने एक दिवशी तिच्या अनैतिक संबंधाने विरोध केल्याने तिने संतापाच्या भरात वडिलांवर तीन दिवसात दोन वेळा हल्ला केला. इतकेच नाही तर तिने तिच्या भावाला देखील जबर जखमी केले. भाऊ राहुलवर संतनीक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या भावाचा नाव राहुल कांबळे (२८ ) असे आहे. आणि तिच्या वडिलांचे नाव शंकर कांबळे असे आहे.
८ जून रोजी सोनालीचा प्रियकर महेश पांडे आणि ती शंकर कांबळे याच्या कामावर पोहोचली. तिथे सोनाली आणि शंकर कांबळे मध्ये वाद झाला. या वादात संतापलेल्या प्रियकराने थेट सोनालीच्या वडिलांना चापट मारली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी सोनाली आणि तिच्या प्रियकराला समाज देऊन सोडून दिले होते.
११ जून २०२५ रोजी सायंकाळी सोनाली आणि महेश या दोघांनी अंधेरी कुर्ला रोडवरील एका हॉटेल बाहेर सोनालीच्या वडिलांना गाठलं आणि त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी शंकर यांचा मुलगा राहूल याने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला तर त्याला देखील मारहाण केली. सोनाली आणि तिच्या प्रियकराने केलेल्या हल्यात शंकर कांबळे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेनंतर पंचनामा केला. सोनाली बैत आणि महेश पांडे या दोघांना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
मुंबई हादरली! संशयाच्या रागातून धारदार शस्त्राने प्रेयसीवर वार