Crime News Live Updates
वर्षभरापूर्वी पुण्यात झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरला संपवले. 5 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री आठ वाजता पुण्यातील नाना पेठ परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकऱ्यांची ओळख पटली असून, त्यांची नावे यश पाटील आणि अमित पाटोळे अशी आहेत. आयुष कोमकर शुक्रवारी रात्री क्लासवरुन घरी परतला होता. तो पार्किंगमध्ये गाडी लावत असताना यश आणि अमित या दोघांनी त्याच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या होत्या. या दोघांनी आयुषच्या शरीरात एक-दोन नव्हे तर एकूण 9 गोळ्या झाडल्या. यानंतर यश पाटील आणि अमित पाटोळे यांनी घटनास्थळी दहशत माजवण्याचा प्रयत्नही केला. आयुषवर गोळीबार करताना हे दोघे, ‘इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच’ असे ओरडत होते, अशी माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी आयुषची आई कल्याणी कोमकर यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करुन घेतला होता. पोलिसांनी तपासावेळी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज कल्याणी कोमकर यांना दाखवले. त्यावेळी आयुषवर गोळ्या झाडणारे दोघेजण यश पाटील आणि अमित पाटोळे असल्याची ओळख पटली होती. दरम्यान, पुणे पोलिसांनी आयुष कोमकर हत्याप्रकरणात संपूर्ण आंदेकर कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे.
08 Sep 2025 04:35 PM (IST)
शासनाने सामान्यजनांसाठी १० लाख लोकसंख्या असलेल्या पालिका क्षेत्रात चार हजार चौ. मीटर अथवा त्यापेक्षा अधिक जमिनीवर घरे उभारताना, त्यात २० टक्के घरे सर्वमान्य नागरिकांसाठी बांधणे बंधनकारक केले आहे. ही घरे शासनाला हस्तांतरित करून, शासन ती सर्वसामान्य नागरिकांना देत असते. मात्र या नियमाला नवी मुंबई तील विकासकांंकडून बगल देत घरे लुबाडण्याचा प्रयत्न केला.
08 Sep 2025 04:30 PM (IST)
कल्याणातील प्रसिद्ध रामदेव हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी जेवणात लोखंडाचा तुकडा आढळल्यानंतर आता फ्राईड राईसमध्ये झुरळ सापडल्याने ग्राहकांमध्ये संताप उसळला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे हॉटेलच्या स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्राहकांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
08 Sep 2025 04:22 PM (IST)
मराठा समाजाच्या महिलांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्ता संगीता वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या महिलांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. संगीता वानखेडे असे गुन्हा दाखल केलेल्या महिला कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी संभाजी ब्रिगेड संघटनेचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी फिर्याद दिली आहे.
08 Sep 2025 04:20 PM (IST)
ईद-ए-मिलादनिमित्त येवला शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. आयना मशिदीपासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत युवकांनी हातात झेंडे घेऊन नात-शरीफ गात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरातील प्रमुख मार्गांवर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत केले. मशिदी व इमारतींवर आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे विविध समाजातील नागरिकांच्या सहभागामुळे भाईचारा आणि धार्मिक एकतेचा सुंदर संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला. पोलिस प्रशासन, नगरपालिका कर्मचारी आणि सामाजिक संघटनांच्या सहकार्याने मिरवणुकीचा शिस्तबद्धतेने समारोप झाला.
08 Sep 2025 04:05 PM (IST)
गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे शनिवार तुषार गारमेंटचे मालक सुनील खटावकर यांच्या घरात झालेल्या गॅस गळतीमुळे सिलिंडरच्या झालेल्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत घरात कोणी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. स्फोटात घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. घराच्या खिडकीच्या काचा फुटून शंभर मीटर अंतरापर्यंत पडल्या होत्या. यामुळे घरात आणि गल्लीत अक्षरशः काचांचा खच पाडला होता. घटना समजतात बघ्यांची मोठी गर्दी उसळली
08 Sep 2025 03:45 PM (IST)
जागेच्या वादातून मालगाव येथील एका शेतकऱ्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण झाल्याचा प्रकार ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान घडला आहे. मोहन रामचंद्र बाबर(वय ६८ व्यवसाय शेती, राहणार. मालगाव) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल रमेश गोडसे राहणार मालगाव यांच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली आहे. प्राप्त फिर्यादीनुसार बाबर यांनी गोडसे यांच्या चुलत्याकडून काही जागा खरेदी केली होती त्या जागेत सध्या त्यांचे वास्तव्य होते. या जागे शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेवरून गोडसे व बाबर यांच्यात वाद सुरू होते याचा राग मनात धरून गोडसे यांनी फिर्यादीला डाव्या गुडघ्याच्या नडगीवर रॉडने मारहाण केली तसेच कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादीचा गुडघा फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर सातारा येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. पोलीस हवालदार कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
08 Sep 2025 03:30 PM (IST)
मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे समोर आहे. या हाणामारीचे कारण प्रॉपर्टीच्या वादातून झाले आहे. लालजीपाडा येथील यादव आणि चव्हाण कुटुंबीयांमध्ये जागेच्या ताब्यासंधर्भातील वाद इतका वाढला की, त्याचे रूप हाणामारीत बदलले. या मारामारीत एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
08 Sep 2025 03:20 PM (IST)
पुलाची शिरोलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी झालेल्या वादात पुलाची शिरोलीतील पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांवर सत्तूरने वार केल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. संतोष राजेश रणदिवे (वय ३५), गौतम हरिश्चंद्र चौगुले (वय ३५, दोघेही रा. इंगळीकर कॉलनी, माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले), मंगल रविंद्र कांबळे (वय ४२), आरती आदेश कांबळे २० व आदेश रविंद्र कांबळे (वय २५, रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना सावंत कॉलनी येथे घडली आहे.
08 Sep 2025 03:04 PM (IST)
वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततचे आजारपण तसेच मुलाला आणि सुनेला त्रास नको म्हणून एका वृद्ध दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. ८१ वर्षीय वृद्ध व्यक्तीने आधी स्वयंपाकघरातील चाकूने पत्नीचा गळा कापून ठार मारले. नंतर त्याच चाकूने स्वतःच्या मनगटाच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या भयंकर घटनेने वसईमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
08 Sep 2025 02:55 PM (IST)
Tropical Storm in China: चीन देशात चक्रीवादळ आले आहे. चीनमध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे. Tropical चक्रीवादळामुळे चीनमध्ये हाहा:कार उडाला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये नैसर्गिक आपत्ती येताना पाहायला मिळत आहे. भारतात देखील पर्वतीय राज्यांमध्ये ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. चीनमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.
08 Sep 2025 02:40 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांनी धाड टाकली. धाड टाकताच पोलिसांना ड्रग्ज नाही तर चक्क जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारी साहित्य आढळली. या घटनेने खळबळ उडाली आहे. या छाप्यात पोलिसांना एक गावठी कट्टा देखील मिळाला आहे.
08 Sep 2025 02:20 PM (IST)
अकोल्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी एका अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय विसर्जनासाठी गेले असता तिच्या घरात घुसून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवत ही घटना घडली आहे. पोलिसांनी एका संशियित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
08 Sep 2025 02:00 PM (IST)
पुण्याच्या खेड तालुक्यातून एक हृदयपिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगायच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ती मागील अकरा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. मात्र ही झुंज अपयशी ठरली. अश्विनी केदारी ही २०२३ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत महिला प्रवर्गात राज्यात पहिली आली होती. तिच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
08 Sep 2025 01:40 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. संभाजीनगरमधील एका अकॅडमीच्या संचालकाने आपल्याच प्रशिक्षणार्थी विध्यार्थी अमोल डक याच अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणामुळे अकॅडमीच्या संचालकाने आपल्या प्रशिक्षणार्थीचं अपहरण केलं आहे. या प्रकरणात आरोपी संचालकाला अटक करण्यात आली असून संचालकांसह आणखी तीन जणांचा समावेश आहे. न्यायालयाने चौघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
08 Sep 2025 01:20 PM (IST)
लातूर जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. चाकूल तालुक्यातील वाढवणा चाकूर रोडवर एका शिवरा जवळील तीरु नदीच्या कडेला झुडपात एका बागेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पाण्याच्या बाजूला असलेल्या झुडपात कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह कुजल्यामुळे दूरवर दुर्गंधी पसरल्याची घटना समोर आली होती. या अज्ञात महिलेच्या खुनाचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी सखोल तपास करून या हत्येचा सुगावा लावला आहे.
08 Sep 2025 01:05 PM (IST)
लक्ष्मी रस्त्यावरील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत विसर्जनाच्या चोवीस तासातली आवाजाची पातळी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी धोकादायक श्रेणीत मोडली गेली आहे. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत नुकत्याच हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेश आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्त्यावरील ध्वनी पातळी किती आणि कशी असेल याची उत्सुकता सर्वांना लागली होती. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने जाहीर केलेल्या अहवालानुसार सहा आणि सात सप्टेंबर रोजी लक्ष्मी रस्त्यावरील दहा महत्त्वाच्या चौकांत मोजमाप केले गेले. सरासरी ९२.६ डेसिबल इतकी भीषण पातळी नोंदवली गेली. खंडोजी बाबा चौकात तर १०९ डेसिबल इतका प्रचंड आवाज नोंदवला गेला. हा स्तर 'आरोग्याला हानिकारक' या श्रेणिक मोडतो. अहवालानुसार गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षीचा आवाज किंचित घटला आहे. मात्र ९० डेसिबलच्याही पुढे ही सरासरी पातळी पोहोचते.
08 Sep 2025 12:45 PM (IST)
आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा 18 वर्षीय मुलगा आयुष कोमकर याला आंदेकर टोळीने टार्गेट करून हत्या केली आहे. या हत्येनंतर पुणे पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या हत्येप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील, (सर्व रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आयुष कोमकर याची आई कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. लक्ष्मी काॅम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
08 Sep 2025 12:25 PM (IST)
पुणे शहरातील गुन्हेगारी विश्वासातील तरुणांना अन् गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांमध्ये पिस्तूल बाळगण्याची एक क्रेझ निर्माण झाल्याचे पाहिला मिळत असून, वारजे माळवाडी आणि पर्वती पोलिसांनी अशाच दोन तरुणांना पिस्तुले बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूले जप्त केली आहेत. वारजे माळवाडी पोलिसांनी यश विनय शहा (वय २५, रा. देशपांडे गार्डन सोसायटी, नर्हे) याला अटक करून त्याच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत पोलिस शिपाई जी. डी. शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. पर्वती पोलिसांनी दुसरी कारवाई केली आहे. दत्तवाडी येथील शिवाजी चौकाजवळ बेकादेशिररित्या पिस्तुल बाळगणार्या एकाला बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. गुरूवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. स्वप्निल प्रविण कांबळे (वय २८, रा. शनि मंदिरामागे, दत्तवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई महेश मंडलीक यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड, महेश मंडलिक व त्यांच्या पथकाने केली आहे.
08 Sep 2025 12:05 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची १ कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यावसायिकाने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, राजीव अशोक केंद्रे (रा. एलेजियम सोसायटी, पिंक सिटी रस्ता, वाकड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
08 Sep 2025 11:46 AM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराने गाडी न दिल्याच्या रागातून लोखंडी पाईप एकाच्या डोक्यात मारला आहे. पाईप डोक्यात मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. निखिल नितीन घाडगे (वय 25 रा. साईनाथनगर भोनेमाळ) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी आशादुल्ला हारुण जमादार (वय 27 रा. अशोक सायझिंगमागे) याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जमादार याला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असतानाही तो शहरात वावरत होता. ही घटना विसर्जन मिरवणूकीदरम्यान रात्री 9 वाजता घडली आहे.
08 Sep 2025 11:25 AM (IST)
गणेशोत्सवाच्या उत्साहात आणि भक्तिभावात विसर्जन मिरवणुका सुरू असताना चाकण परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी (ता. खेड) येथील पाणवठ्यांमध्ये गणेश विसर्जन करताना चार तरुण पाण्यात बुडाले. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून, एकाचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.