रांचीत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश (फोटो- istockphoto)
रांची पोलिसांनी उघड केले रॅकेट
21 लोकांना पोलिसांकडून अटक
हॉस्टेलमधली धक्कादायक घटना
Ranchi Crime News: झारखंड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. रांचीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रांची येथे एका हॉस्टेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. रांची शहरातील लालपुर येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लालपुर येथील हॉस्टेलमाडून पोलिसांनी 10 मुली आणि 11 अन्य लोकांना अटक केली आहे.
रांची येथील लालपुर भागातील एका हॉस्टेलमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या ठिकाणी संघटितपणे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे माहिती पोलिसांना प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलिसांची पथके या ठिकाणी छापेमारीसाठी दाखल झाली. दरम्यान घटनास्थळावरून अटक करण्यात आलेल्या युवती आणि अन्य आरोपींकडून पोलिस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान या गुन्ह्यातील प्रमुख आरोपींना शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.
हॉस्टेलमध्ये नेमके काय सुरू होते?
रांची येथील लालपुर भागात एका हॉस्टेलमध्ये खूप काळापासून देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. देहविक्री करणारी गॅंग या ठिकाणी मुलीना लपवून ठेवत असे व या ठिकाणावरून बाहेर पाठवत असे. या बदल्यात ते मोठ्या रकमेची मागणी करत असत. माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी केली आहे.
तपासात मोठे खुलसे होण्याची शक्यता
अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीतून अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. लवकरच या प्रकरणातील मुख्य आरोपीना अटक होण्याची शक्यता आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात देखील पोलिसांनी देहविक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये 26 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने प्रशिक्षणार्थीचे अपहरण
छत्रपती संभाजीनगरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. संभाजीनगरमधील एका अकॅडमीच्या संचालकाने आपल्याच प्रशिक्षणार्थी विध्यार्थी अमोल डक याच अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणामुळे अकॅडमीच्या संचालकाने आपल्या प्रशिक्षणार्थीचं अपहरण केलं आहे. या प्रकरणात आरोपी संचालकाला अटक करण्यात आली असून संचालकांसह आणखी तीन जणांचा समावेश आहे. न्यायालयाने चौघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरमधील हिंदवी करिअर अकॅडमीचा संचालक दशरथ जाधव याचं अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडलं होतं. यामुळे त्याने विध्यार्थी अमोल डख याची मदत घेतली होती. मात्र आपला चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचे अमोलच्या लक्षात येताच संचालक आणि त्याच्यामध्ये वाद झाला. यानंतर दशरथ यांनी अमोलला अकॅडमीमधून काढून टाकलं.