Crime News Live Updates
25 Aug 2025 01:20 PM (IST)
कोलकाता येथून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. कोलकाता येथील साऊथ साऊथ कोलकाता लॉ कॉलेज येथे सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. आधी एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ चित्रित करण्यात आले. त्यांनतर पीडितेला ब्लॅकमेल करून सामूहिक बलात्कार करण्यात आला.
25 Aug 2025 12:50 PM (IST)
वैभवशाली गणेशोत्सावाने पुण्यनगरीचे वातावरणात भक्तीमय झालेलं आहे. “जय गणेशा”च्या गजराने पुण्यनगरी उजळली जात असताना मात्र, दुसरीकडे शहर "कोयत्याच्या टोकावर थरथरत" आहे. गेल्या काही महिन्यांत घडत असलेल्या कोयत्याचे हल्ले, तोडफोडीचे सत्र अन् रक्तांच्या धारांच्या खेळाने पुणेकरांत दहशतीचे काळे सावट पसरलेले आहे. दोन गटातील वाद आणि त्यामुळे होणारे हल्ले, रस्त्यातील टोळीबाजी आणि किरकोळ वादातून वाहणारे रक्त या सगळ्याने “सुरक्षित पुणे”च्या प्रतिमेला जबर धक्का बसला जात आहे. काही केल्याने घटना पोलिसांना थांबवता येत नसल्याने आता सर्व सामान्य पुणेकर "लाडक्या बप्पा''लाच पुण्यनगरीतला गुन्हेगारीचा खेळ थांबव, अशी आर्त हाक मारू लागले आहे. गेल्या ७ महिन्यात ३३६ कोयत्याने हल्ले व गोळीबाराच्या १० घटना घडल्या आहेत.
25 Aug 2025 12:43 PM (IST)
सुप्रीम कोर्टाने सोमवारी ऐतिहासिक निर्णय देताना नागपूर येथील वसंत संपत दुपारे यांची फाशीची शिक्षा स्थगित केली. यापूर्वी 2014 मध्ये सुप्रीम कोर्टानेच दुपारे यांच्या फाशीवरील पुनर्विचार याचिका फेटाळली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज नामंजूर केला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या निकालालाच स्थगिती दिली आहे.
25 Aug 2025 12:25 PM (IST)
बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मांजरसुंबा-अंबाजोगाई राज्य महामार्गावरील एका हॉटेलबाहेर केवळ किरकोळ वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तरुण रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मांजरसुंबा-अंबाजोगाई राज्य महामार्गावर असलेल्या एका हॉटेलबाहेर तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. अगदी किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेल्या तरुणाचे नाव विजय केदार (रा. सांगवी, ता. केज) असे आहे. घटनेच्या वेळी विजय केदार महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेला होता. त्यावेळी त्याचा वेटरसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की हॉटेल मालकाने देखील यात हस्तक्षेप करत विजयवर हल्ला चढवला. हल्ल्यात वेटर आणि हॉटेल मालक दोघांनी मिळून विजयला बेदम मारहाण केली.
25 Aug 2025 12:05 PM (IST)
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सासवड रस्त्यावर पूर्वी झालेल्या वादातून तरुणावर हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाच्या डोक्यात गज घालून गंभीर जखमी केले आहे. वडकी नाला भागात ही घटना घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विकी सुरेश खोमणे (वय ३८, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती,) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ऋषिकेश हनुमंत चव्हाण, मयुर संजय चव्हाण, तेजस तानाजी खंडाळे, सुरज बाबजी खोमणे, अक्षय ऊर्फ गोटू छगन माकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खोमणे याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
25 Aug 2025 11:48 AM (IST)
बुलढाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कुख्यात गुंड शेख हाफिज शेख नफिज उर्फ बाब्याची तिघांनी जुन्या वादातून हत्या केली आहे. लाकडी दांडके व चाकूने हल्ला करुन बाब्याला संपविले आहे. या खुनाच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. बुलढाण्यातील इंदिरानगरमधील कुख्यात गुंड बाब्या अमावस्यानिमित्त सैलानी येथे जत्रेत गेला होता. मध्यरात्रीनंतर त्याचा मृतदेह सैलानीत आढळून आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बाब्या आवडत्या पांढऱ्या ड्रेसमध्ये होता. मिळालेल्या माहितीनुसार बाब्या सैलानीत दाखल झाल्यावर आरोपी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर जुन्या वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली आणि आरोपींनी बाब्याला लाकडी राफ्टरने मारहाण करून आणि नंतर चाकू खुपसून संपवून टाकले.
25 Aug 2025 11:29 AM (IST)
प्रेमाला विरोध केल्यानंतर अल्पवयीन मुलाने साथीदारांच्या मदतीने प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी या खूनाचा छडा लावत तिघांना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. जुन्या कात्रज बोगद्याजवळील डोंगरावर कात्रजमधील तरुणाचा खून केला होता. सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. पंचरत्न सोसायटी, मांगडेवाडी, कात्रज) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी श्रीमंत अनिल गुज्जे (वय २१, रा. खंडोबा मंदिराजवळ, वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, रा. वडगाव मावळ), नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८, रा. गोकुळनगर, कात्रज, मूळ रा. खुठे गाव, ता. औसा, जि. लातूर) यांना अटक केली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहायक निरीक्षक तुकाराम राठोड, उपनिरीक्षक अजित पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.
25 Aug 2025 11:27 AM (IST)
पुण्यातून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायटीतील फ्लॅट फोडून साडे आठ लाखांचा ऐवज चोरी झाला होता. याप्रकरणात सुरक्षा रक्षकच चोरटा निघाला असून, याप्रकरणाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राकेशकुमार मूलचंद सोनी (वय २९, रा. राम अमिलिया, जि. अनुपपूर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, पोलिस कर्मचारी प्रकाश मरगजे व त्यांच्या पथकाने केली आहे.
नालासोपाऱ्यात IITN अकॅडमीच्या शिक्षकाकडून 16 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबतची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अकॅडमीमध्ये जाऊन शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. त्यानंतर पालकांनी शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. राहुल दुबे असे वासनांध शिक्षकांचे नाव असून, नालासोपारा पश्चिम आयआयटीएन अकॅडमीमधील शिक्षक आहे.