(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूडमधील पॉवर कपलपैकी एक असलेल्या परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. हे जोडपे नुकतेच कपिल शर्माच्या शोमध्ये दिसले होते. यादरम्यान राघवने संकेत दिले होते की तो लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी देईल. दरम्यान, आता राघव आणि परीने आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच आई – बाबा होणार असल्याचे समजले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नंसीची घोषणा करून चाहत्यांना खुश केले आहे.
एक सुंदर फोटोसह शेअर केली पोस्ट
सोमवारी, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी इन्स्टाग्रामवर एका संयुक्त पोस्टद्वारे अभिनेत्रीने स्वतःच्या प्रेग्नंसीची आनंदाची बातमी शेअर केली. या दोघांनी गोड फोटो शेअर केला आहे, ज्यावर नवजात बाळाच्या पावलांचे छोटे ठसे दिसत आहेत आणि त्यावर १ + १ = ३ लिहिलेले दिसत आहे, याचा अर्थ आता कुटुंब वाढणार आहे. यासोबतच, या जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आमचे छोटेसे जग, लवकरच येत आहे.’ ही आनंदाची बातमी ऐकून चाहत्यांसह अनेक कलाकार या जोडप्यांचे अभिनंदन करत आहेत.
कलाकारांनी केले जोडप्यांचे अभिनंदन
सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी येताच, अनेक स्टार्स अभिनेत्री परिणीती आणि राघवचे अभिनंदन करत आहेत. हुमा कुरेशीने लिहिले, ‘अभिनंदन.’ भूमी पेडणेकरने तीन रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत. त्याच वेळी, टीना दत्ताने देखील अभिनंदन केले. याशिवाय, सोनम कपूरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, ‘अभिनंदन प्रिये.’ इतकेच नाही तर चाहते परिणीती-राघव हे आई वडील झाल्याचा आनंद व्यक्त करत आहेत.
परिणीती आणि राघवचे लग्न कधी झाले?
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी २४ सप्टेंबर २०२३ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे लग्न केले. या भव्य विवाह सोहळ्याला मनोरंजन जगतातील आणि राजकारणातील मान्यवर आणि जवळचे लोक उपस्थित होते. तसेच राघव चढ्ढा यांनी नुकतेच ‘द कपिल शर्मा शो’ दरम्यान परिणीती चोप्राच्या गरोदरपणाचे संकेत दिले होते आणि आता या दोघांनी आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.