
बारामतीत पोलिसांचा मोठा प्रहार! जिममधील तरुणांना विकले जाणारे 'टर्मिन' इंजेक्शन जप्त (Photo Credit- AI)
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एम.ई.सी.बी. कार्यालयाजवळील सेवा रस्त्यावर एक व्यक्ती संशयास्पदरीत्या इंजेक्शनचा साठा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या वेळी दुचाकीवर बसलेल्या संशयित तरुणास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव गौरव बाळासो जाधव (वय २४, रा. आमराई, बारामती) असे सांगितले.
पोलिसांनी दुचाकीची झडती घेतली असता डिकीत ठेवलेल्या खाकी बॉक्समध्ये “मेफेन्टरमाइन सल्फेट इंजेक्शन” या प्रकारातील एकूण १०० सिलबंद इंजेक्शन आढळून आली. आरोपीकडे या औषधांच्या खरेदीची कोणतीही वैध कागदपत्रे, वैद्यकीय चिठ्ठी किंवा परवाना आढळून आला नाही. प्राथमिक चौकशीत आरोपी हे इंजेक्शन शरीर क्षमता वाढविण्यासाठी व जिममध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना प्रत्येकी सुमारे पाचशे रुपयांना विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.
Crime News: पिसे बंधूंच्या मटकाबुकीवर निर्भया पथकाची धाड, माजी नगराध्यक्षांच्या मुलासह सहाजण ताब्यात
या कारवाईत पोलिसांनी ३३ हजार ४०० रुपये किमतीची १०० इंजेक्शन तसेच ५० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान दि २३ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील पथकास गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावितरण कार्यालयाजवळ एक युवक संशयास्पदरीत्या इंजेक्शनचा साठा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यावेळीत्याचे नाव गौरव बाळासो जाधव (वय २४, रा. आमराई बारामती) असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याजवळ असलेल्या स्कुटीची झडती घेतल्यानंतरत्याच्याकडे शरीराला घातक असणारी १०० इंजेक्शन व इतर औषधे सापडली. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे सखोल तपास सुरू आहे
औषध निरीक्षक सचिन बुगड यांनी दिलेल्या माहितीनुसार हे इंजेक्शन वैद्यकीय सल्ल्याशिवाय विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. मूळतः कमी रक्तदाबाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या या औषधाचा गैरवापर शरीर क्षमता वाढविण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. या इंजेक्शनचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास गुंगी येणे, भास होणे, झटके येणे, हृदयाचे ठोके मंदावणे यांसारखे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर तसेच बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही धाडसी कारवाई यशस्वी केली.
“कोणत्याही नागरिकाने किंवा तरुणाने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही इंजेक्शन, स्टेरॉईड्स किंवा तत्सम शरीर क्षमता वाढविणारी औषधे वापरू नयेत. जिमच्या आडून अशा प्रकारची बेकायदेशीर विक्री होत असल्यास, नागरिकांनी त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी.” — श्रीशैल चिवडशेट्टी (पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस ठाणे)