Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

तिकीट काळाबाजाराचे मोठे रॅकेट मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणात मुंबईच्या एका माजी 22 वर्षीय क्रिकेटपटूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 29, 2026 | 05:10 PM
क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक (Photo Credit - AI)

क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक (Photo Credit - AI)

Follow Us
Follow Us:

  • क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ!
  • मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक
  • नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर
T20 World Cup Ticket Black Market Scandal: नुकत्याच भारतात पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील तिकीट काळाबाजाराचे (Ticket Black Marketing) मोठे रॅकेट मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणात मुंबईच्या एका माजी 22 वर्षीय क्रिकेटपटूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील उपांत्य फेरीच्या (Semifinal) सामन्याच्या तिकिटांची चढ्या दराने विक्री केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?

टी-20 वर्ल्ड कप 2026 चा उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळवण्यात आला होता. या हाय-व्होल्टेज सामन्याच्या तिकिटांची मोठ्या प्रमाणावर काळाबाजारी झाल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली होती. तपासादरम्यान, मुंबईच्या 19 वर्षांखालील (Under-19) संघाचा माजी क्रिकेटपटू बलवंत सिंह स्वरूप सिंह सोढा याचे नाव समोर आले. 26 वर्षीय सोढा याला या गुन्ह्यातील सातवा आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली आहे.

25 हजारांना विकले तिकीट; पोलिसांकडून मोबाईल जप्त

पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोढा याने प्रत्येकी 25 हजार रुपयांना दोन तिकिटांची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी कारवाई दरम्यान सोढाचा मोबाईल फोन जप्त केला असून, त्यातील चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सवरून या रॅकेटमधील इतर दुव्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, ही तिकिटे त्याला नेमकी कुठून आणि कशी मिळाली, याबाबत सोढाने अद्याप मौन बाळगले आहे.

मनीषाला नऱ्हेत भेटायला बोलावले, गोड बोलून दाट झाडीत नेले अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) पोलिसांचे पत्र

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आतापर्यंत एकूण 24 बनावट किंवा काळाबाजारात विकली जाणारी तिकिटे जप्त केली आहेत. या रॅकेटची पाळेमुळे नेमकी कुठे आहेत, हे शोधण्यासाठी पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) पत्र लिहिले आहे. तिकिटांचे वाटप कसे करण्यात आले होते आणि अधिकृत विक्रेत्यांव्यतिरिक्त इतक्या मोठ्या प्रमाणावर तिकिटे बाहेर कशी आली, याचे उत्तर पोलिसांनी एमसीएकडून मागवले आहे.

भारताने कोरले होते विजेतेपदावर नाव

विशेष म्हणजे, याच विश्वचषकात भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. मात्र, या विजयाच्या जल्लोषात आता तिकीट काळाबाजारासारख्या गंभीर प्रकरणाने गालबोट लावले आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही बड्या व्यक्तींचा किंवा क्रिकेटशी संबंधित लोकांचा समावेश आहे का, याचा तांत्रिक विश्लेषण (द्वारे पोलीस शोध घेत आहेत. येत्या काळात या प्रकरणात आणखी काही अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Crime News : चोरट्यांनी पळवल्या मोबाईल टॉवरच्या २३ बॅटऱ्या; गंगाखेडमधील चोरीच्या घटनेत वाढ

Web Title: Major sensation in cricket circles former mumbai cricketer arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • crime news
  • IND Vs ENG
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

बारामती पोलिसांची मोठी कारवाई, बुलेट चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल ३० लाखांच्या दुचाकी जप्त
1

बारामती पोलिसांची मोठी कारवाई, बुलेट चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल ३० लाखांच्या दुचाकी जप्त

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?
2

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम
3

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम

बिल्डर असल्याचे सांगून 14.78 लाखांना गंडा; आरोपीला चंद्रपूरमधून केली अटक
4

बिल्डर असल्याचे सांगून 14.78 लाखांना गंडा; आरोपीला चंद्रपूरमधून केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.