Chandrapur Crime News: चंद्रपुरच्या प्रियदर्शनी चौकात आढळले मान कापलेले मुंडके, तर रेल्वे उड्डाणपुलाखाली सापडले धड
चंद्रपूर शहरातील भर चौकात एका अज्ञात पुरुषाचे कापलेले मुंडके
रेल्वे उड्डाणपुलाखाली सापडले मृतदेहाचे धड.
अन्यत्र हत्या करून पुरावा लपवण्याचा प्रयत्न
Chandrapur murder News: चंद्रपूर शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील प्रियदर्शनी चौकात एका अज्ञात पुरुषाचे कापलेले मुंडके आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.तर उर्वरित धड काही अंतरावरील रेल्वे उड्डाणपुलाखाली आढळून आले. या प्रकारामुळे संपूर्ण चंद्रपूर शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संपूर्ण परिसराची तपासणी सुरू केली असून संबंधित मृत व्यक्तीची दुसरीकडे हत्या करण्यात आली असावी आणि दोन्ही भाग वेगळे करून तिथे फेकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर मयताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून तपासाला वेग दिला. श्वानपथकाच्या मदतीने आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.
पिंपरीत एटीएम फोडून 20 लाखांची रोकड लांबवली; एटीएम मशीन गॅस कटरने कापले अन्…
श्वानाने दाखवलेल्या दिशेने तपास केला असता, चौकापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाखाली जाहिरात फलकाच्या खांबाजवळ पुरुषाचे धड आढळून आले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, ती निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तपास करत आहेत.
दुसरीकडे नागपूरमध्ये काही अज्ञात लुटारूंनी व्यापारी सुरेश परमार यांच्या वाहनचालकाकडील कार चाकूचा धाक दाखवून पळवून नेल्याची घटना घडली. या कारमध्ये सुमारे पावणे चार कोटी रुपयांची रोकड असल्याचा दावा परमार यांनी केला आहे. तर लुटारूंनी कारमधील रोकड घेऊन वाहन खैरी परिसरात सोडून दिल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परमार यांचे वाहनचालक मोहन राव हे बुधवारी रात्री उशिरा कारमधून मोठी रोख रक्कम घेऊन निघाले होते. त्यावेळी काही अज्ञात लुटारूंनी त्यांना चाकूचा धाक दाखवून कार पळवून नेली. या घटनेदरम्यान व्यापाऱ्याच्या घरासमोरील सुरक्षा रक्षकावरही चाकूने हल्ला करून त्याला जखमी केल्याची माहिती आहे.
लुटारूंनी खैरी परिसरात कार सोडून दिली; मात्र त्यातील रोकड घेऊन पसार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला असून, लुटारूंचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. रोकडची नेमकी रक्कम आणि घटनेचा संपूर्ण तपशील पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.
Ans: चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी चौकात एका अज्ञात पुरुषाचे कापलेले मुंडके आढळले, तर काही अंतरावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाखाली मृतदेहाचे धड सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Ans: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली. श्वानपथकाच्या मदतीने शोध घेतला असता धड उड्डाणपुलाखाली आढळले. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Ans: सध्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीस विविध कोनातून तपास करत असून, मयताची ओळख पटवण्यासाठी आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी कसून चौकशी सुरू आहे.






