धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्...
नागपूर : घरबांधणीच्या पूजेच्या निमित्ताने घरी आलेल्या विवाहित महिलेवर एका तरुणाने अत्याचार केल्याचा आरोप समोर आला. याप्रकरणी भिसी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिस तक्रारीनुसार, रविवारी दुपारी ते रात्री दरम्यान परिसरातील एका गावात ही घटना घडली.
घरबंधनाची पूजा करण्यासाठी शुभम लटारी खंगार (वय २६, रा. मसाडा, ता. वरोरा), सचिन परमेश्वर मोकड (वय २८, रा. चिखल वानोजा, ता. वरोरा) आणि तेजस गुंडेराव वालकटे (वय २४, रा. उमरेड, जि. नागपूर) हे तिघे महिलेच्या घरी आले होते. पूजा झाल्यानंतर महिलेच्या पतीच्या अंगात असून, बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत बेडरूमची पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला आत नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर शुभम याने धमकी देत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, घटनेनंतर महिलेने पती व कुटुंबीयांना प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपीला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी भिसी पोलिस ठाण्यात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार मंगेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर मुळे करीत आहेत.
पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार
पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीची मावळ न्यायालयाने जेलमध्ये रवानगी केली आहे. पीडित तरुणीने फिर्याद दिल्याने वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु लक्ष्मण माडगी (वय 31, रा. चतुर्भुज रेसीडेन्सी, फ्लॅट नं 201, विशाल लॉन्स, वडगाव ता. मावळ, जि. पुणे) न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचे नाव आहे.
तरुणीचे अपहरण करून अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी देत १८ वर्षीय तरुणीचे अॅम्ब्युलन्समधून अपहरण केले. तिला आळंदी येथील आर्य सेवा संस्थेत नेऊन रजिस्टरवर जबरदस्ती स्वाक्षऱ्या करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार १६ ते १७ जूनदरम्यान घडला आहे. याप्रकरणी दत्ता दिनकर गायकवाड याच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Disha Salian case : दिशा सालियन मृत्यूचे गूढ उकलणार; मुंबई उच्च न्यायालयाकडून सीबीआय चौकशीची मंजुरी






