Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

पूजा झाल्यानंतर महिलेच्या पतीच्या अंगात असून, बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत बेडरूमची पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला आत नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर शुभम याने धमकी देत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 02, 2026 | 01:47 PM
धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्...

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्...

Follow Us
Follow Us:

नागपूर : घरबांधणीच्या पूजेच्या निमित्ताने घरी आलेल्या विवाहित महिलेवर एका तरुणाने अत्याचार केल्याचा आरोप समोर आला. याप्रकरणी भिसी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिस तक्रारीनुसार, रविवारी दुपारी ते रात्री दरम्यान परिसरातील एका गावात ही घटना घडली.

घरबंधनाची पूजा करण्यासाठी शुभम लटारी खंगार (वय २६, रा. मसाडा, ता. वरोरा), सचिन परमेश्वर मोकड (वय २८, रा. चिखल वानोजा, ता. वरोरा) आणि तेजस गुंडेराव वालकटे (वय २४, रा. उमरेड, जि. नागपूर) हे तिघे महिलेच्या घरी आले होते. पूजा झाल्यानंतर महिलेच्या पतीच्या अंगात असून, बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत बेडरूमची पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला आत नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर शुभम याने धमकी देत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, घटनेनंतर महिलेने पती व कुटुंबीयांना प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपीला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी भिसी पोलिस ठाण्यात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार मंगेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर मुळे करीत आहेत.

पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार

पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीची मावळ न्यायालयाने जेलमध्ये रवानगी केली आहे. पीडित तरुणीने फिर्याद दिल्याने वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु लक्ष्मण माडगी (वय 31, रा. चतुर्भुज रेसीडेन्सी, फ्लॅट नं 201, विशाल लॉन्स, वडगाव ता. मावळ, जि. पुणे) न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचे नाव आहे.

तरुणीचे अपहरण करून अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी देत १८ वर्षीय तरुणीचे अ‍ॅम्ब्युलन्समधून अपहरण केले. तिला आळंदी येथील आर्य सेवा संस्थेत नेऊन रजिस्टरवर जबरदस्ती स्वाक्षऱ्या करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार १६ ते १७ जूनदरम्यान घडला आहे. याप्रकरणी दत्ता दिनकर गायकवाड याच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Disha Salian case : दिशा सालियन मृत्यूचे गूढ उकलणार; मुंबई उच्च न्यायालयाकडून सीबीआय चौकशीची मंजुरी

Web Title: Married woman assaulted under the pretext of a puja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • crime news
  • Nagpur Crime
  • Nagpur News

संबंधित बातम्या

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
1

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
2

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके
3

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास
4

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.