Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा! ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त; महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर

छत्रपती संभाजीनगरमध्ये एमडी ड्रग्जची मोठी कारवाई! ९६ लाखांचा मुद्देमाल जप्त. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्ये ड्रग्ज माफियांचे जाळे वाढले असून पोलीस कारवाईचा वेग वाढला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 06, 2026 | 03:13 PM
Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा! ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त; महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर
Follow Us
Close
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा!
  • ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त
  • महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर
अंकुश थोरात । नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर: वाढते शहरीकरण अन् ऐशोआरामाचे जीवन धुंदीत जगण्याचे वेड आता वाढत आहे. हीच बाब हेरत नशेच्या साहित्याचा पुरवठा करणाऱ्या टोळीने सहजपणे आपले जाळे महाविद्यालय अन् उच्चभ्रू तरुणांवर टाकून आजच्या पिढीला हेरले आहे. शहरातील उच्चभ्रू वस्त्या, आणि महाविद्यालयीन परिसरांपर्यंत एमडी (मेफेड्रोन) या सिंथेटिक इगचा पोहोचलेला विळखा हा केवळ गुन्हेगारी कारवाईचा विषय राहिलेला नाही, तो समाजाच्या एकूणच मूल्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा मुद्दा ठरत आहे.

गुन्हे शाखेने अर्धा किलोहून अधिक एमडीसह सुमारे ९६ लाखांचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली असली, तरी या घटनेने शहरात वाढत चाललेल्या नशेच्या मागणीचे वास्तव उघड केले आहे. असे असले तरी याचे म्होरके आजही पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एमडी जप्तीची कारवाई केवळ दाखवण्यापुरती ठेवता कामा नये. तरुणांना नशेच्या आहारी लावून पेडलर जे साध्य करुन घेण्यात यशस्वी होत असले तरी पोलिसांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे.

तरुणाईच्या बदलत्या नशेच्या पॅटर्नचा, वाढत्या मागणीचा आणि गुन्हेगारी नेटवर्कच्या विस्ताराचा गंभीर इशारा आहे. पूर्वी चरस, गांजा किंवा कोडीनयुक्त सिरप यासारख्या पदार्थापुरती मर्यादित असलेली नशा आता एमडी सारख्या महागड्या आणि अधिक घातक ड्रगपर्यंत पोहोचली आहे. मोबाईल संपर्क, ऑनलाईन पेमेंट आणि या आधुनिक पद्धतींनी व्यवहार होत असल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे.

बारामतीतील ज्येष्ठ महिलेची फसवणूक; अटकेची भीती दाखवत लाखो रुपयांना घातला गंडा

तरुणाई का अडकतेय?

एकदा द्वाय करू ही मानसिकता, सोशल मीडियावर दिसणारा ग्लॅमर, आर्थिक सक्षमता आणि स्पर्धात्मक जीवनातील ताण या घटकामुळे तरुणाई एमडीकडे आकर्षित होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. सुरुवातीला पाटी किंवा मित्रपरिवारातील प्रयोग म्हणून घेतलेले ड्रग पुढे मानसिक अस्थिरता, नैराश्य, आक्रमकता आणि शैक्षणिक घसरण यास कारणीभूत ठरते.

शहरातील नागरिकांसमोर उभे ठाकलेले प्रश्न

हाय-प्रोफाईल वस्त्यांपर्यंत एमडी पोहोचत असेल, तर ते केवळ कायद्याचे नव्हे तर समाजाच्या सामूहिक अपयशाचे लक्षण आहे. अडीचशेवर एनडीपीएस गुन्हे आणि कोट्यवधींची जप्ती ही आकडेवारी नसून तरुण पिढीला दिलेला गंभीर इशारा आहे. नशेविरोधातील लढा पोलिसांपुरता मर्यादित न राहता कुटुंब, महाविद्यालये, समाज प्रशासन यांच्या संयुक्त प्रयांतूनच प्रभाषी ठरू शकतो; अन्यथा ‘पार्टी डुग’चा विळखा अधिक घट्ट होण्याची भीती कायम राहणार आहे.

धास्ती वाढली…

२०२५ माये पोलिस आयुक्तालय हद्दीत २५१ एनडीपीएस गुन्हे दाखल झाले. या प्रकरणांत ३६५ आरोपीना अटक करण्यात आली, तर एकुण १ कोटी ९१ लाख रुपयांची अमलीपदार्थ जप्त झाली. तर २०२६ च्या तीन महिन्यातच पोलिसांनी ५० वर आरोपीना बेड्या ठोकल्या असून १ कोटी ४८ लाख ९६ हजार ६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, यात जानेवारी महिन्यात ११ कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यात २७ जणांना अटक करण्यता आली आहे. तर ७ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४१ लाख ७८ हजार ६६० रुपयांचा मुद्देमला जप्त करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात ३ कारवाई करुन ९ जणांना बेडढा ठोकल्या आहेत तर ९० लाख ५९ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मार्च महिन्यात ४ आरोपीना बेड्या ठोकल्या असून ९० लाख ५९ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

संतापजनक! शाळेच्या गेटसमोरच तरुणाचे अश्लील चाळे; नगरसेविकेने घेतली दखल

Web Title: Md busted in chhatrapati sambhajinagar drugs worth 96 lakhs seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Drugs News

संबंधित बातम्या

बारामतीतील ज्येष्ठ महिलेची फसवणूक; अटकेची भीती दाखवत लाखो रुपयांना घातला गंडा
1

बारामतीतील ज्येष्ठ महिलेची फसवणूक; अटकेची भीती दाखवत लाखो रुपयांना घातला गंडा

संतापजनक! शाळेच्या गेटसमोरच तरुणाचे अश्लील चाळे; नगरसेविकेने घेतली दखल
2

संतापजनक! शाळेच्या गेटसमोरच तरुणाचे अश्लील चाळे; नगरसेविकेने घेतली दखल

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा
3

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Navi Mumbai: कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिकेची सुटका
4

Navi Mumbai: कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिकेची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.