Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: युवकाकडून अल्पवयीन मुलाचा खून; एकवीस महिन्यात हुबेहूब घटना, विषय काय?

साईराजच्या खुनानंतर आरोपी असलेल्याचा चुलत भाऊ अक्षय मांजरे हा स्थानिक नागरिकांच्या गर्दीमध्ये पोलीस व वनविभाग अधिकाऱ्यांच्या सोबत फिरत असल्याचे उघड झाल्याने आता पहिल्या घटनेकडे देखील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 18, 2026 | 04:02 PM
Crime News: युवकाकडून अल्पवयीन मुलाचा खून; एकवीस महिन्यात हुबेहूब घटना, विषय काय?

Crime News: युवकाकडून अल्पवयीन मुलाचा खून; एकवीस महिन्यात हुबेहूब घटना, विषय काय?

Follow Us
Follow Us:

अल्पवयीन मुलाचा मृतदेश सापडल्याने खळबळ
विहीरीच्या कडेला डोक्यावर जखम झालेल्या अवस्थेत मृतदेह
दहिवडीमधील धक्कादायक घटना

शिक्रापूर: शिरुर येथील मांजरे वस्ती येथे २१ जून २०२४ रोजी यश गायकवाड या बालकाचा डोक्यावर जखम असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेला असताना त्याच ठिकाणी त्याच शेतात व त्याच विहिरीच्या कडेला त्याच पद्धतीने डोक्यावर जखम असलेल्या अवस्थेत खून झालेल्या बालकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून साईराज गणेश मांजरे असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे.

दहिवडी ता. शिरुर येथील साईराज गणेश मांजरे हा बारा वर्षीय बालक १७ मार्च २०२६ रोजी दुपारी घरातून गेला मात्र पुन्हा घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर एकवीस महिन्यांपूर्वी ज्या ठिकाणी यश गायकवाडचा मृतदेह आढळून आला त्याच ठिकाणी ज्या पद्धतीने यशचा मृतदेह मिळाला त्याच पद्धतीने साईराज मांजरेचा मृतदेह आढळून आला, घटनेची माहिती मिळताच शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान नागरिकांनी काही दिवसांपूर्वी यश गायकवाडचा देखील अशाच पद्धतीने मृत्यू होऊन त्याचे कारण समोर आले नाही मात्र पोलिसांनी वनविभागाच्या माथी प्रकरण मारल्याचा आरोप करत या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद करा तेव्हाच आम्ही मृतदेह हलवू अशी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांनी स्थानिकांचा रोष लक्षात घेत, घटनास्थळीच फिर्याद घेत अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा नोंद केला, सदर घटनेबाबत गणेश जयसिंग मांजरे वय ३८ वर्षे रा. मांजरेवस्ती दहिवडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला.

Crime News: ५ मृतदेह, ३ पिस्तुलं आणि कपाळावर गोळी! हत्या की आत्महत्या? पोलीसही चक्रावले

दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिक्रापूर पोलीस घटनेचा तपास करत असताना पोलिसांना अक्षय मांजरे बाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने सदर खून केल्याची कबुली दिली, तर पोलिसांनी अक्षय दत्तात्रय मांजरे वय २२ वर्षे रा. मांजरेवस्ती दहिवडी ता. शिरुर जि. पुणे याला अटक केली असून खुनाचे कारण तपासात पुढे येईल अशी माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड हे करत आहे.

दहिवडी येथील साईराज माजरे याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून शिक्रापूर पोलिसांनी घटनेचा छडा लावला त्याच प्रकारे एकवीस महिन्यांपूर्वी यश गायकवाडच्या प्रकरणाचे तत्कालीन तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास केला असता तर यश गायकवाडला देखील न्याय मिळाला असता अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

खून करणारा आरोपी थेट गर्दीमध्ये . . . . . . . .

दहिवडी येथील साईराजच्या खुनानंतर आरोपी असलेल्या त्याचा चुलत भाऊ अक्षय मांजरे हा स्थानिक नागरिकांच्या गर्दीमध्ये पोलीस व वनविभाग अधिकाऱ्यांच्या सोबत फिरत असल्याचे उघड झाल्याने आता पहिल्या घटनेकडे देखील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Pakistan Hindu Murder: बांगलादेशनंतर आता पाकिस्तानातही हिंदूवर अत्याचार! २३ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या; नेमकं कारण काय?

दहिवडी येथील यश गायकवाड व साईराज मांजरे या दोघांचे मृतदेह एकाच ठिकाणी, एकाच विहिरी जवळ, एकाच ठराविक वेळेत तर दोघांच्याची डोळ्यालाच जखम अशा अवस्थेत मिळून आले, मात्र यश गायकवाडचा मृतदेह बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचे बोलले गेले मात्र तसा अहवाल प्राप्त झाला नाही मात्र बिबट्याचा हल्ला नसून खून असल्याचा संशय स्थानिकांना होता व आज देखील बिबट्याचा हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात असताना स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेऊन वनविभाग मध्ये घेऊच नका अशी मागणी करत ठिय्या मांडला होता.

Web Title: Minor youth murdered by young man in dahiwadi shikrapur shirur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • crime news
  • Murder
  • Shikrapur

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.