Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar Crime : चार वर्षीय मुलाच्या मृत्यूचे गूढ उलगडले! आईच्या प्रियकराकडून हत्या; मृतदेह नाल्यात फेकून अपघाताचा बनाव

Mira Bhayandar Crime Marathi : चार वर्षीय मुलाचा मृत्यू हा अपघात नसून हत्या असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आईच्या प्रियकराने चिमुकल्याची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकत अपघाताचा बनाव रचल्याचे धक्कादायक सत्य उघड झाले असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 03, 2026 | 12:06 PM
चार वर्षीय मुलाच्या मृत्यूचे गूढ उलगडले! आईच्या प्रियकराकडून हत्या; मृतदेह नाल्यात फेकून अपघाताचा बनाव

चार वर्षीय मुलाच्या मृत्यूचे गूढ उलगडले! आईच्या प्रियकराकडून हत्या; मृतदेह नाल्यात फेकून अपघाताचा बनाव

Follow Us
Follow Us:
  • चार वर्षीय मुलाचा मृत्यू नसून हत्या
  • पोलिस तपासात धक्कादायक सत्य उघड
  • आईच्या प्रियकराकडून चिमुकल्याची हत्या
  • मृतदेह नाल्यात फेकून अपघाताचा बनाव
विजय काते, भाईंदर : काशिमीरा परिसरातील नीलकमल नाका येथील नाल्यात मृतावस्थेत आढळलेल्या चार वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचे गूढ काशिमीरा पोलिसांनी उलगडले असून, हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुलाच्या आईच्या प्रियकराने बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्यात फेकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मंगळवारी सकाळी नीलकमल नाका परिसरातील एका उघड्या नाल्यात चार वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना काही बाबी संशयास्पद वाटल्याने तपासाची दिशा बदलली.

Solapur Crime: मी तुला आझाद करतोय…; पत्नीसाठी शेवटचा व्हिडीओ बनवत 38 वर्षीय पतीची आत्महत्या

तपास अधिकारी महाजन यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात आला. अहवालातून हा मृत्यू अपघाती नसून मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पोलिसांनी मुलाच्या आईचा प्रियकर जांभू शर्मा उर्फ ‘नेपाळी’ याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. सोमवारी दुपारी दारूच्या नशेत असताना त्याने मुलाला बेदम मारहाण केल्याचे सांगितले. ही घटना मुलाच्या आईसमोरच घडली होती. त्यानंतर रात्री झोपेतून उठल्यावर मुलाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जवळील नाल्यात फेकून दिल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिमुकल्यामुळे त्याला मुलाच्या आईसोबत एकांतात वेळ घालवता येत नसल्याचा राग आरोपीच्या मनात होता. तसेच मुलगा वारंवार रडत असल्याने संतापाच्या भरात त्याने त्याला मारहाण केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

Pimpri Chinchwad News: पत्नीने दारू पिण्यास नकार दिल्याने पतीची आत्महत्या; विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू

आरोपी, मुलाची आई आणि मृत चिमुकला हे तिघेही बेघर असून कचरा वेचण्याचे काम करत होते. ते काशिमीरा उड्डाणपुलाखाली वास्तव्यास होते. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण आणि काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

Web Title: Mira bhayandar crime four year old boy murder mother lover killed body thrown in drain accident cover up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • crime
  • mira bhayandar
  • police

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
2

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
3

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
4

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.