Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : मिरा-भाईंदर हादरलं! डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला; आर्थिक वादातून ब्लेडने वार केल्याचा आरोप

मिरा-भाईंदरमधील भाईंदर पूर्व परिसरात एका डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक व्यवहारातून सुरू झालेल्या वादानंतर ब्लेडसदृश धारदार वस्तूने वार करून दगडाने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, नवघर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 26, 2026 | 11:21 AM
मिरा-भाईंदर हादरलं! डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला; आर्थिक वादातून ब्लेडने वार केल्याचा आरोप

मिरा-भाईंदर हादरलं! डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला; आर्थिक वादातून ब्लेडने वार केल्याचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • भाईंदर पूर्वेत डिलिव्हरी बॉयवर हल्ला
  • ‘105 टोळी’चा आधार घेत मारहाणीचा आरोप
  • नवघर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
विजय काते, भाईंदर : मिरा-भाईंदर शहर झपाट्याने वाढत असताना परिसरात गुंड प्रवृत्ती आणि टोळीबाजीचे प्रकार वाढत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. भाईंदर पूर्वेतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान परिसरात रविवारी (25 मे) संध्याकाळी एका डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात तक्रारदाराने एका तरुणासह त्याच्या साथीदारांवर ब्लेडसदृश धारदार वस्तूने वार करून दगडाने मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसागर पांडुरंग भोरगे (वय 24), व्यवसाय – डिलिव्हरी बॉय, यांनी नवघर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितले की, त्यांचा परिचित राहुल पासवान याच्यासोबत पूर्वी आर्थिक व्यवहारावरून वाद झाला होता. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी दिलेले पैसे बुडाल्यानंतर ते पैसे परत करण्यात आले होते, मात्र त्यानंतरही धमक्या आणि वाद सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ट्विशा शर्मा घटनेची पुनरावृत्ती? लखनाैमध्ये नवविवाहितेचा संशायास्पद मृत्यू; 6 महिन्यांआधी झालं होतं लग्न

तक्रारीनुसार, दोघांमधील वाद मिटवण्यासाठी 25 मे रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता भाईंदर पूर्वेतील बाळासाहेब ठाकरे मैदानाजवळ भेट ठरवण्यात आली होती. त्यावेळी वाद वाढून राहुल पासवान आणि त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तींनी शिवीगाळ, धक्काबुक्की करत ब्लेडसारख्या धारदार वस्तूने पोट व छातीवर वार केला तसेच डोक्याच्या मागील बाजूस दगडाने मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप आहे. “तुला भाईंदरमधून जाऊ देणार नाही,” अशी धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. जखमी भाऊसागर भोरगे यांचे मित्र घटनास्थळी आल्यानंतर आरोपी पळून गेल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर जखमीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून नवघर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली.

दरम्यान, स्थानिकांकडून राहुल पासवान कुटुंबाविरोधात पूर्वीही परिसरात वाद, भांडणे आणि मारहाणीच्या घटना घडल्याचे आरोप करण्यात येत आहेत. तसेच या हल्ल्यामागे कथित “105 टोळी” चा आधार असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी पोलिसांकडून झालेली नाही.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, बाळासाहेब ठाकरे मैदान परिसरात काही बाहेरील व्यक्ती नियमितपणे एकत्र येऊन गट तयार करत असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केवळ एफआयआर नोंदवून न थांबता सखोल तपास करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. नवघर पोलीस या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पुढील कारवाई करणार का? की वाढत्या टोळीबाजीमुळे परिसरातील नागरिक असुरक्षितच राहणार?

पोलीस अधिकाऱ्याचं भयानक कांड! तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; सलग दोन वर्षे…

Web Title: Mira bhayandar delivery boy attacked bhayander east financial dispute blade attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • crime
  • mira bhayandar
  • police

संबंधित बातम्या

Lotus Navratri Festival: गरब्याचा पास खरेदी करा अन् शेतकऱ्यांना मदत करा! लोटस नवरात्रोत्सवाची अनोखी मोहीम
1

Lotus Navratri Festival: गरब्याचा पास खरेदी करा अन् शेतकऱ्यांना मदत करा! लोटस नवरात्रोत्सवाची अनोखी मोहीम

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
2

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या
3

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या

Mira Bhayndar : मिरा-भाईंदरमध्ये स्वयंपुनर्विकासाचा पाया रचणार, आमदार नरेंद्र मेहतांचा पुढाकार
4

Mira Bhayndar : मिरा-भाईंदरमध्ये स्वयंपुनर्विकासाचा पाया रचणार, आमदार नरेंद्र मेहतांचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.