(फोटो सौजन्य: X)
पोलीस अधिकाऱ्याचं भयानक कांड! तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; सलग दोन वर्षे…
लखनाैच्या काशी विहार काॅलेनीत राहणाऱ्या २९ वर्षीय श्वेत सिंह हिचा मृतदेह सोमवारी तिच्या सासरच्या घरी आढळला. तिने गळफास घेत स्वत:चे आयुष्य संपवल्याची माहिती आहे. यानंतर श्वेताच्या माहेरी घटनेची माहिती देण्यात आली ज्यानंतर कुटुंबावर शोककळा पसरली. श्वेताचे आई-वडिला आणि भावाने सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आणि तिची हत्या करण्याचा गंभीर आरोप केला. पोलिसांनी श्वेताचा मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
माहितीनुसार, ठाकूरगंजमधील विश्वनगर मल्हाई टोला येथील रहिवासी श्वेता सिंह हिचे लग्न २२ नोव्हेंबर २०२५ रोजी काशी विहार येथील रहिवासी शिवम सिंग याच्याशी झाला होता. शिवम एका लॅबमध्ये काम करत होता. श्वेताच्या वडिलांनी आरोप केला की, श्वेताच्या सासरची मंडळी हुंडा आणि महागड्या सामानासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते.
घटनेने संशयास्पद वळण तेव्हा घेतले जेव्हा सर्व घटनेचा कार्यकाळ एकत्र जोडण्यात आला. खरंतर आत्महत्येपूर्वी संपूर्ण परिस्थिती नाॅर्मल होती. आईची तब्बेत बरी नसल्याने श्वेता आदल्या शनिवारी हाॅस्पिटलमध्ये आईला भेटायला गेली. आईची विचारपूस करुन ती घरी गेली आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सासरकडून फोन आला की श्वेताने गळफास घेत आत्महत्या केली आहे. श्वेताच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, या घटनेमागे एक मोठा कट रचण्यात आला होता. कुटुंबियांनी सांगितले की, पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी माहेरचे घरी येण्याआधीच श्वेताचा मृतदेह खाली आणला आणि मग घाईघाईत त्याला केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले.
धक्कादायक ! धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; व्हिडिओही काढला अन्…
श्वेताच्या बहिणीने सांगितले की, रविवारी जेव्हा फोनवर तिचे श्वेताबरोबर संभाषण झाले तेव्हा श्वेता तिला तणावात वाटली नाही. दरम्यान श्वेताच्या वडिलांकडून आता ठाकुरगंज पोलिस ठाण्यात हुंडाबळीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून रोपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल ज्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.






