Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar मध्ये मोठी दहशतवादविरोधी कारवाई; फरार आरोपी हुजैफा दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात

Mira Bhayandar Terrorist Arrest : मीरा-भाईंदर परिसरात लपून बसलेल्या फरार दहशतवादी आरोपी हुजैफाला दिल्ली स्पेशल सेलने मोठ्या कारवाईत अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या ऑपरेशनमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून, आरोपीच्या दहशतवादी संबंधांचा तपास सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 03, 2026 | 05:52 PM
Mira Bhayandar मध्ये मोठी दहशतवादविरोधी कारवाई; फरार आरोपी हुजैफा दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात

Mira Bhayandar मध्ये मोठी दहशतवादविरोधी कारवाई; फरार आरोपी हुजैफा दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात

Follow Us
Follow Us:
  • फरार दहशतवादी हुजैफा अटकेत
  • मीरा-भाईंदरमध्ये दिल्ली स्पेशल सेलची धडक कारवाई
  • फरार दहशतवादी आरोपी हुजैफाला दिल्ली स्पेशल सेलने पकडलं
विजय काते, मीरा-भाईंदर : महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त कारवाई करत मीरा-भाईंदर परिसरातून फरार दहशतवादी आरोपी हुजैफा याला अटक केली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये करण्यात आलेल्या अटक आणि चौकशीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हुजैफा हा कथितरित्या सैयद मुदस्सिर हुसेन उर्फ मुन्ना झिंगाडा यांच्या संपर्कात होता. मुन्ना झिंगाडाचा संबंध दाऊद इब्राहिम टोळीशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, तो या मॉड्यूलच्या कारवायांना मार्गदर्शन करत असल्याचा आरोप आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील वांद्रे परिसरातील रेल्वे जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या तणावाचा फायदा घेत तरुणांना भडकवून बेकायदेशीर व दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करण्याचा कट रचला जात होता. या कटाचे संचालन पाकिस्तानातील कराची येथून होत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

Crime News: टोमॅटोच्या क्रेटवरून वाद विकोपाला; भाजी विक्रेत्याचा मृत्यू, चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हुजैफावर मुंबईत स्थानिक नेटवर्क उभारणे आणि कारवायांसाठी आर्थिक व्यवस्था करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तपासादरम्यान त्याला या नेटवर्ककडून सुमारे एक लाख रुपये मिळाल्याचे समोर आले आहे. तसेच काही तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करून कामाच्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात येत असल्याची माहितीही उघड झाली आहे.

या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले तौकीर आणि साजिद शेख यांना अनुक्रमे कुर्ला आणि मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आले होते. दोघेही अमली पदार्थांच्या व्यसनाधीन असून सहज पैसा मिळविण्याच्या लालसेपोटी या नेटवर्कच्या संपर्कात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अंडरवर्ल्ड गँगस्टर मुन्ना झिंगाडाचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या हुजैफाला बुधवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी केली असून पुढील चौकशीसाठी त्याला दिल्लीला नेण्याची तयारी सुरू आहे. सध्या तपास यंत्रणा संपूर्ण नेटवर्क, त्याचे आर्थिक स्रोत आणि कथित दहशतवादी कारवायांशी असलेले संबंध यांचा सखोल तपास करत आहेत.

Bihar Crime: आईने बॉयफ्रेंडलाच बनवलं जावई, पुढं घडलं भयानक, कुणाचा गेला जीव?

Web Title: Mira bhayandar fugitive terror accused huzaifa arrested delhi special cell

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • crime
  • mira bhayandar
  • police

संबंधित बातम्या

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या
1

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
2

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत
3

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना
4

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.