काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील मृत्यू झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे नाव साजिदा असे आहे. तर आरोपी आईचे नाव शाइस्ता परवीन आणि जावई अब्बू नासर असे आहे. गेल्या पाच वारशांपासून शाइस्ता आणि अब्बू नासर यांचे प्रेमसंबंद होते. सतत लपून-छपून भेटावं लागत असल्यानं दोघंही वैतागले होते.त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचं लग्न अब्बूसोबत लावण्याचा निर्णय घेतला. मुलीचं वय सोळा तर अब्बू तिच्याहून 20 वर्षांनी मोठा. साहजिकच मुलीनं नकार दिला. मात्र तीच न ऐकता तिचं लग्न करण्यात आलं.
सासरवाडीच्या फेऱ्या वाढल्या….
सुरुवातीला अब्बू पत्नीला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहू लागला. मात्र काही महिन्यांतच त्याच्या सासरवाडीच्या फेऱ्या वाढल्या. तो आपल्या सासूला म्हणजे प्रेयसी शाइस्ता परवीनला भेटायला जायचा. साजिदाने अनेकदा तिच्या आईला आणि नवऱ्याला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. मात्र यावरून घरात सातत्याने वाद होत होते. यामुळे दोन्हीही आरोपी त्रस्त होते.
अंत्यसंस्कार करण्यासाठी घाई…
साजिदाच्या वडिलांनी सांगितले की, ते दोघं बरेच दिवस घराबाहेर रहायचे आणि घरात असले तर एका खोलीत बंद असायचे. जेव्हा मुलीचा मृत्यू झाला तेव्हा ते घरी नव्हते. ते घरी आल्यावर मुलीची तब्येत बरी नसल्याने तिला दवाखान्यात नेले होते आणि आता ती झोपलीये, असं दोघांनी तिला सांगितलं. वडिलांनी बघितले तर ती बेशुद्धावस्थेत घरातच होती. तेव्हा सर्वांना तिचा मृत्यू झाल्याचं समजलं. सासू आणि जावई तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी घाई करु लागल्याने वडिलांचा संशय बळावला. त्यांनी या प्रकरणाची तक्रार तातडीने पोलिसात दाखल केली.
पोलीस तपास सुरु
पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदन करिता पाठवला. पोस्ट मार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर तिचा मृत्यू कश्यामुळे झाला हे समोर येईल. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.
Ans: ही घटना बिहारमधील अररिया येथे घडली.
Ans: सासू शाइस्ता परवीन आणि जावई अब्बू नासर यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.
Ans: पोस्टमार्टम अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार असून पोलिस तपास करत आहेत.






