Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : “रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्ती का केली?” बिष्णोई गँगकडून RTO अधिकाऱ्याला धमकी, मिरा-भाईंदरात तणावाचे वातावरण

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनंतर सुरु झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी वादात आता कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 13, 2026 | 03:39 PM
Mira Bhayander : “रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्ती का केली?” बिष्णोई गँगकडून RTO अधिकाऱ्याला धमकी, मिरा-भाईंदरात तणावाचे वातावरण
Follow Us
Close
Follow Us:
  • “रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्ती का केली?”
  • बिष्णोई गँगकडून RTO अधिकाऱ्याला धमकी
मिरा-भाईंदर/ विजय काते : मुंबई महानगर प्रदेशात रिक्षाचालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या प्रस्तावावरून निर्माण झालेला वाद आता अत्यंत संवेदनशील टप्प्यावर पोहोचला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनंतर सुरु झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी वादात आता कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे केवळ राजकीयच नव्हे, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
धमकीच्या फोनमुळे खळबळ मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) अधिकारी नलावडे यांना अज्ञात क्रमांकावरून धमकीचा फोन आला.

“रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्ती का केली?” असा सवाल करत संबंधित व्यक्तीने धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात हा कॉल लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर RTO प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर; पती, सासू-सासऱ्यांसह सात जणांना अटक

परिवहन विभागाकडून तातडीची हालचाल
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत परिवहन विभागाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिक पोलिसांनाही सतर्क करण्यात आले असून, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि तांत्रिक तपासाद्वारे धमकी देणाऱ्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

मराठी सक्तीचा निर्णय काय आहे?
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच स्पष्ट केले होते की, “मुंबईत रिक्षा चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला मराठी भाषा येणे आवश्यक आहे. मराठी न येणाऱ्या चालकांचे परमिट रद्द केले जाऊ शकते.” या विधानामागे स्थानिक भाषेला प्राधान्य देणे आणि प्रवाशांशी संवाद सुलभ करणे हा उद्देश असल्याचे सांगितले गेले.

तथापि, या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला आहे. मुंबईसारख्या बहुभाषिक शहरात अशा प्रकारची सक्ती योग्य आहे का, यावर विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित होत आहेत.राजकीय प्रतिक्रिया आणि विरोध या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिंदी भाषिक विभागाचे मुंबई प्रमुख मनीष दुबे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यांनी म्हटले की, “रिक्षाचालक हा मुंबईच्या वाहतुकीचा कणा आहे. त्यांनी कर्ज काढून रिक्षा घेतली आहे आणि दिवस-रात्र मेहनत करून प्रवाशांना सेवा देतात. अशा परिस्थितीत अचानक भाषिक अट लादणे अन्यायकारक आहे.”

ते पुढे म्हणाले, “मराठी भाषा शिकणे आवश्यक आहे, यात शंका नाही. पण त्यासाठी किमान सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी द्यायला हवा. जर 1 एप्रिल 2027 पर्यंत मराठी शिकणे बंधनकारक केले, तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ. मात्र, अल्प कालावधीत असा आदेश लागू केला, तर आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू.”

मराठी शिकवणी वर्गांची पुढाकार
या वादाच्या पार्श्वभूमीवर काही संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी रिक्षाचालकांसाठी मराठी शिकवणी वर्ग सुरू करण्याचा पुढाकार घेतला आहे. “कोणतीही भाषा शिकण्याचे वय नसते. योग्य संधी आणि वेळ दिल्यास चालक नक्कीच मराठी शिकतील,” असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.सामाजिक आणि कायदेशीर परिणामया प्रकरणामुळे समाजात भाषिक ध्रुवीकरण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिरा-भाईंदरसारख्या भागात विविध राज्यांतील लोक मोठ्या प्रमाणावर राहत असल्याने हा वाद अधिक संवेदनशील ठरतो आहे.तसेच, बिष्णोई गँगसारख्या गुन्हेगारी संघटनेचे नाव या वादात समोर आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोलिसांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

प्रशासनाचे आवाहन
दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे सांगण्यात आले आहे.या संपूर्ण घडामोडींमुळे मिरा-भाईंदरसह मुंबईत राजकीय, सामाजिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणाला आणखी वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sangli Crime: संतापजनक! मनोरुग्ण मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाचा टोकाचा पाऊल; डोक्यात दगड घालून मुलाचा खून

Web Title: Mira bhayander why was marathi language forced on rickshaw pullers bishnoi gang threatens rto officer tense atmosphere in mira bhayander

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • crime news
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Crime News: चित्रपटासारखा थरार! जुन्या वैमनस्यातून चालकाचा पाठलाग करून अपहरण; वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल
1

Crime News: चित्रपटासारखा थरार! जुन्या वैमनस्यातून चालकाचा पाठलाग करून अपहरण; वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! पत्नीची छेड काढल्याने मित्राचाच दगडाने ठेचून खून; एलसीबीकडून ४८ तासांत आरोपी जेरबंद
2

छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! पत्नीची छेड काढल्याने मित्राचाच दगडाने ठेचून खून; एलसीबीकडून ४८ तासांत आरोपी जेरबंद

Blue Drum Case: एका हातावर हार्ट, दुसऱ्यावर नावाचा टॅटू, निळ्या ड्रमात सापडला तरुणीचा मृतदेह; ओळख अजूनही गुलदस्त्यात
3

Blue Drum Case: एका हातावर हार्ट, दुसऱ्यावर नावाचा टॅटू, निळ्या ड्रमात सापडला तरुणीचा मृतदेह; ओळख अजूनही गुलदस्त्यात

आळेफाट्यात दिवसाढवळ्या तरुणीवर हल्ला; ‘लिव्ह-इन’ पार्टनरने रस्त्यातच गाठलं अन् ब्लेडने…
4

आळेफाट्यात दिवसाढवळ्या तरुणीवर हल्ला; ‘लिव्ह-इन’ पार्टनरने रस्त्यातच गाठलं अन् ब्लेडने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.