Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blue Drum Case: एका हातावर हार्ट, दुसऱ्यावर नावाचा टॅटू, निळ्या ड्रमात सापडला तरुणीचा मृतदेह; ओळख अजूनही गुलदस्त्यात

Punjab Crime : हत्येचे गूढ प्रकरण! पंजाबच्या पटियाला येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह निळ्या ड्रमात कोंबल्यात आला होता. मुलीची ओळख अद्याप पटली नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 29, 2026 | 02:27 PM
Blue Drum Case: एका हातावर हार्ट, दुसऱ्यावर नावाचा टॅटू, निळ्या ड्रमात सापडला तरुणीचा मृतदेह; ओळख अजूनही गुलदस्त्यात

Blue Drum Case: एका हातावर हार्ट, दुसऱ्यावर नावाचा टॅटू, निळ्या ड्रमात सापडला तरुणीचा मृतदेह; ओळख अजूनही गुलदस्त्यात

Follow Us
Follow Us:
  • कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या निळ्या ड्रमामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास वेगाने सुरू आहे.
  • मृत तरुणीच्या शरीरावरील काही खास चिन्हांमुळे ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
  • पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी नियोजनपूर्वक हालचाल केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पंजाबच्या पटियाला येथून एक धक्कादायक आणि भयानक बातमी समोर आली आहे. मागील निळ्या ड्रमची दहशत कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा असेच प्रकरण समोर आले आहे. अर्बन इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डीसीडब्ल्यू पुलाजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हा निळा ड्रम सापडला. या ड्रमात पोलिसांना एका १५ ते २० वर्षांच्या तरुणीची मृतदेह सापडला आहे. मुलीचा दिसण्यावरुन ती दुसऱ्या राज्याची (प्रवासी) असल्याचा अंदाज आहे पण तिची नेमकी ओळख अजूनही पटलेली नाही.

Bihar News : मुलाच्या शाैचावरुन वाद; लोखंडी राॅडने मारहाण करत महिलेला केले ठार, परिसरात तणावाचे वातावरण

मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्या परिसरातून जाणाऱ्या एका व्यक्तीचे लक्ष ड्रमाकडे गेले. त्याला पाहता क्षणीच ड्रमात काहीतरी असल्याचा संशय आला आला आणि त्याने लगेच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस घटनेस्थळी दाखल होताच त्यांनी ड्रमाचे झाकण उघडून पाहिले ज्यानंतर एक भयंकर दृष्य त्यांच्या नजरेस पडले. ड्रमाच्या आत एका तरुण मुलीचा मृतदेह दाबून ठेवण्यात आला होता. तिच्या चेहऱ्यावर काही जखमा होत्या आणि हातावर रक्त लागले होते.

दोन्ही हातांवर आढळला टॅटू

तरुणीच्या हत्येचा तपास करण्यासाठी जेव्हा पोलिसांनी तिच्या मृतदेहाची तपासणी केली तेव्हा त्यांना तिच्या दोन्ही हातांवर टॅटू दिसून आले. या टॅटूच्या मदतीने मुलीची ओळख पटवण्यात पोलिसांना मोठी मदत झाली. तिच्या एका हातावर इंग्रजीत NEHA (नेहा) हे नाव लिहिण्यात आले होते तर दुसऱ्या हातावर हृदय म्हणजेच Heart शेपचा टॅटू तयार करण्यात आला होता.

पुरावा नष्ट करण्यासाठी निळ्या ड्रमाचा वापर करण्यात आला

पोलिसांचा असा अंदाज आहे की, मुलीची हत्या, ड्रम आढळलेल्या ठिकाणी नाही तर दुसऱ्या भलत्याच ठिकाणी झाली असावी. पोलिसांच्या मते, मुलीची हत्या एका ठिकाणी करुन तिला निळ्या ड्रमात टाकले असावे आणि मग गाडीत भरुन तिला दुसऱ्या ठिकाणी आणून फेकले जेणेकरुन कुणालाही शंका येऊ नये. ज्या ठिकाणी निळा ड्रम फेकण्यात आला होता ते ठिकाण एक ‘ब्लाइंड स्पॉट’ होते, म्हणजेच तिथे एकही सीसीटीव्ही कॅमेरा उपस्थित नव्हता. यावरुन आरोपींनी जाणून बुजून मृतदेह फेकण्यासाठी या ठिकाणाची निवड केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तथापि, पोलिस आजूबाजूच्या रस्त्यांवरील आणि संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत जेणेकरुन आरोपींना ओळखण्यात मदत होईल.

आळेफाट्यात दिवसाढवळ्या तरुणीवर हल्ला; ‘लिव्ह-इन’ पार्टनरने रस्त्यातच गाठलं अन् ब्लेडने…

72 तास शवागारात ठेवण्यात आला मृतदेह

घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी ताबडतोब फाॅरेंसिंक टीमला घटनास्थळी बोलवले. फाॅरेंसिंक एक्सपर्टने, ड्रमावरील आणि मृतदेहावरील हाताचे ठसे आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा केले आहेत ज्यानंतर मृतदेहाला शवागारात ठेवण्यात आलंय. ६२ तास उलटले असून अजूनही हा मृतदेह शवागारात ठेवण्यात आलाय. मृताची ओळख अद्याप पटली नसून पोलिसांनी मृताचे फोटोज सर्व पोलिस ठाण्यात आणि सोशल मिडियावर सर्कुलेट केले आहेत. पोलिसांच्या मते, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. सध्या तरी पोलिस या गूढ हत्याकांडाचा तपास करत आहेत.

 

Web Title: Punjab patiala murder case young girl dead body found in blue drum crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Punjab

संबंधित बातम्या

Kolhapur Firing Case: कोल्हापुर हादरलं! दिवसाढवळ्या भर चौकात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?
1

Kolhapur Firing Case: कोल्हापुर हादरलं! दिवसाढवळ्या भर चौकात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?

मुलीला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आईची हत्या; विटेने मारहाण केली अन्…
2

मुलीला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आईची हत्या; विटेने मारहाण केली अन्…

रक्षकच झाला भक्षक! पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलगी आरोपीच्या घरी गेली अन् त्याने…
3

रक्षकच झाला भक्षक! पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलगी आरोपीच्या घरी गेली अन् त्याने…

धक्कादायक ! गुप्तधनाच्या हव्यासापोटी व्यापाऱ्याचा नरबळी; आरोपीच्या मुलानेही दिली साथ
4

धक्कादायक ! गुप्तधनाच्या हव्यासापोटी व्यापाऱ्याचा नरबळी; आरोपीच्या मुलानेही दिली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.