Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: चित्रपटासारखा थरार! जुन्या वैमनस्यातून चालकाचा पाठलाग करून अपहरण; वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात जुन्या वैमनस्यातून एका चालकाचा कारने पाठलाग करून अपहरण केल्याची घटना घडली आहे. संकेत चव्हाण आणि त्याच्या ३ साथीदारांविरुद्ध वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 29, 2026 | 05:10 PM
चित्रपटासारखा थरार! जुन्या वैमनस्यातून चालकाचा पाठलाग करून अपहरण

चित्रपटासारखा थरार! जुन्या वैमनस्यातून चालकाचा पाठलाग करून अपहरण

Follow Us
Follow Us:

 

  • चित्रपटासारखा थरार!
  • जुन्या वैमनस्यातून चालकाचा पाठलाग करून अपहरण
  • वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): जुन्या वैमनस्यातून एका चालकाचा चित्रपटातील थरारासारखा पाठलाग करून त्याचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यात घडली. धामोरी गावातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून आरोपींनी त्याला लासूर नाका परिसरातील मोकळ्या जागेत नेले. तेथे लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना २६ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

संकेत भानुदास चव्हाण (रा. बऱ्हाणपूर, ता. नेवासा) व त्याचे तीन साथीदार अशी अपहरण करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब भाऊसाहेव हापसे (३६, रा. बिडकीन, ता. पैठण) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. ते टोयोटा कंपनीत चालक म्हणून काम करतात. हापसे व संकेत चव्हाण यांच्यात यापूर्वीपासून वैर होते. काही वर्षांपूर्वी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात संकेत चव्हाण याने तक्रार दिली होती. त्या प्रकरणात हापसे यांना अटक झाली होती. तेव्हापासून दोघांमध्ये तीव्र शत्रुत्व निर्माण झाले होते. त्त्यामुळे ही मारहाण झाल्याचे दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! पत्नीची छेड काढल्याने मित्राचाच दगडाने ठेचून खून; एलसीबीकडून ४८ तासांत आरोपी जेरबंद

नागरिक जमा होताच आरोपी झाला पसार

यानंतर आरोपींनी हापसे यांना लासूर नाका परिसरातील मोकळ्या जागेत नेले. तेथे लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत हापसे जखमी झाले. दरम्यान, त्यांनी आरडाओरड सुरू केल्याने परिसरातील नागरिक जमा होऊ लागले. नागरिक येत असल्याचे पाहताच आरोपी कारमधून पसार झाले. त्यानंतर हापसे यांनी त्यांच्या भावाशी संपर्क साधला. प्रकरणात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

त्याचे पाठलाग करून अपहरण अन् धमकी

२६ मे रोजी सायंकाळी हापसे हे दुचाकीवरून बऱ्हाणपूर येथून बीडकीनकडे निघाले होते. इसारवाडी फाट्याजवळ आल्यानंतर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुचाकीचा वेग वाढवत धामोरी फाट्याकडील रस्ता पकडला. गावात पोहोचल्यानंतर हापसे यांनी एका घरासमोर दुचाकी थांबवून मदतीसाठी आरडाओरड केली. कारमधून उत्तरलेल्या संकेत चव्हाण व त्याचे साथीदारांनी हापसे यांना कारमध्ये बसवले. मारहाण करत आज तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Blue Drum Case: एका हातावर हार्ट, दुसऱ्यावर नावाचा टॅटू, निळ्या ड्रमात सापडला तरुणीचा मृतदेह; ओळख अजूनही गुलदस्त्यात

Web Title: Driver abducted after being chased due to old enmity case registered with waluj police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

गोळीबार प्रकरण चांगलेच भोवले! अधिकाऱ्यांची बदली; पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय
1

गोळीबार प्रकरण चांगलेच भोवले! अधिकाऱ्यांची बदली; पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

Pune Crime : हडपसरमधील घरफोडीचा लागला छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
2

Pune Crime : हडपसरमधील घरफोडीचा लागला छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल
3

जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना
4

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.