Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! पत्नीची छेड काढल्याने मित्राचाच दगडाने ठेचून खून; एलसीबीकडून ४८ तासांत आरोपी जेरबंद

छत्रपती संभाजीनगरमधील कच्ची घाटी येथील अज्ञात मृतदेहाचा छडा एलसीबीने ४८ तासांत लावला आहे. पत्नीची छेड काढल्याच्या रागातून शेख फैयाजने त्याचा मित्र शेख आवेश याचा दगडाने ठेचून खून केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 29, 2026 | 04:21 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! पत्नीची छेड काढल्याने मित्राचाच दगडाने ठेचून खून (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! पत्नीची छेड काढल्याने मित्राचाच दगडाने ठेचून खून (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ!
  • पत्नीची छेड काढल्याने मित्राचाच दगडाने ठेचून खून
  • एलसीबीकडून ४८ तासांत आरोपी जेरबंद
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): कच्ची घाटी परिसरात आढळलेल्या अज्ञात मृतदेह प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ४८ तासांत छडा लावत आरोपीला जेरबंद केले. पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्राचाच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक कबली आरोपीने पोलिसांसमोर दिली. शेख फैयाज शेख महेमूद (२६, रा. रेहमानिया कॉलनी, किरडपुरा) असे अटक आरोपीचे नाव असून, मयत शेख आवेश शेख परवेज (२५) हा त्याचा जवळचा मित्र होता.

२५ मे रोजी कच्ची घाटी परिसरात २५ ते २७ वयोगटातील एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला मृताची ओळख पटत नसल्याने चिकलठाणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र प्रकरण गंभीर असल्याची दखल घेत पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्ह शाखेच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून तपासाची सूत्रे वेगाने फिरवली.

त्यानंतर मृताची ओळख शेख आवेश शेख परवेज (रा. कसबा चौक, जालना, ह.मु. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फुटपाथ) अशी पटली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत, उपनिरीक्षक महेश घुगे, कासीम शेख, सचिन राठोड, सुनिल गोरे, बलवीर बहुरे, शिवाजी मगर, निलेश कुडे तसेच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बनसोडे, उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे आदींनी केली.

Blue Drum Case: एका हातावर हार्ट, दुसऱ्यावर नावाचा टॅटू, निळ्या ड्रमात सापडला तरुणीचा मृतदेह; ओळख अजूनही गुलदस्त्यात

मित्रासोबत स्कूटीवर गेल्यानंतर बेपत्ता

तपासादरम्यान मयत आवेश हा २५ मे रोजी सकाळी त्याचा मित्र शेख फैयाज याच्यासोबत काळ्या रंगाच्या स्कुटीवर गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर संशयाची सुई फैयाजकडे वळली. पोलिसांनी त्याला किरडपुरा येथील घरातून ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

पत्नीवर वाईट नजर असल्याचा संशय

मयत आवेश हा त्याचा मित्र असला तरी तो आरोपीच्या पत्नीची वारंवार छेड काढत होता. याबाबत अनेकदा समज देऊनही तो ऐकत नसल्याने आरोपीच्या मनात संताप होता. २५ मे रोजी सकाळी दोघेही दारू पित असताना पुन्हा याच कारणावरून वाद झाला. भांडण विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात फैयाजने आवेशचा खून केला.

Web Title: Friend brutally murdered with a stone for harassing wife lcb apprehends accused within 48 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Murder

संबंधित बातम्या

जुना वादातून मामेभावाच्या डोक्यात हातोडा घालून खून, सोबतच्या मित्रालाही मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
1

जुना वादातून मामेभावाच्या डोक्यात हातोडा घालून खून, सोबतच्या मित्रालाही मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Delhi Crime: दिल्लीत लज्जास्पद घटना! 16 वर्षाच्या मुलीवर स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार, 47km पर्यंत घृणास्पद काम
2

Delhi Crime: दिल्लीत लज्जास्पद घटना! 16 वर्षाच्या मुलीवर स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार, 47km पर्यंत घृणास्पद काम

‘भावेश मोरेशी वाद का घालतो ?’ म्हणत तरुणावर हल्ला; डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

‘भावेश मोरेशी वाद का घालतो ?’ म्हणत तरुणावर हल्ला; डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातून महिलेचे दागिने चोरीला; भरदिवसा घडला प्रकार
4

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातून महिलेचे दागिने चोरीला; भरदिवसा घडला प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.