Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai : अभिनेत्रीच्या मुलाने 57 व्या मजल्यावरुन टाकली उडी; संपवले आयुष्य

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रींच्या मुलाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही अभिनेत्री कांदिवली परिसरातील सी ब्रुक वास्तव्याला होती. ती टेलिव्हिजनवरील गुजराती मालिकांमध्ये काम करत होती.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 03, 2025 | 10:22 AM
crime (फोटो सौजन्य : social media)

crime (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रींच्या मुलाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही अभिनेत्री कांदिवली परिसरातील सी ब्रुक वास्तव्याला होती. ती टेलिव्हिजनवरील गुजराती मालिकांमध्ये काम करत होती. बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

धक्कादायक! जबरदस्तीने मित्राला लिंगबदल करण्यास भाग पाडून बलात्कार, १० लाख दिले नाही तर आयुष्य…..

प्राथमिक माहितीनुसार, अभिनेत्रीने आपल्या मुलाला ट्युशनला जाण्यास सांगितले. मात्र त्याला जायचे नव्हते. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे मुलगा संतापला होता. याच संतापाच्या भरात मुलाने इमारतीच्या 57 व्या मजल्यावर जाऊन खाली उडी टाकली. उडी टाकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहितीमिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु या मुलाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली. याचा तपास पोलीस करत आहे. आत्महत्या करणारा मुलगा या दाम्पत्याचा एकुलता एका मुलगा होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

धक्कादायक ! डॉक्टरने तरुणीला चेकअपच्या नावाखाली बेडवर झोपवलं अन् नंतर…

गडचिरोली : रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना देव समजले जाते. मात्र, गेल्या काही वर्षात याच डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना कोरची तालुक्यात उघडकीस आली आहे. उपचाराच्या नावाखाली खासगी डॉक्टरने एका तरुणीशी गैरवर्तन केले. ही घटना बुधवारी (दि.2) सकाळी 9 वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोरी येथे घडली.

डॉक्टर असलेल्या सुभाष हरप्रसाद बिश्वास (वय 48, रा. बोरी, ता. कोरची) याच्या विरोधात बेडगाव पोलिसांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुभाष यास अटक केली. बेडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातील 26 वर्षीय पीडित तरुणीला जुलाबाचा त्रास होत असल्याने ती आपल्या भावासोबत तालुक्यातील बोरी येथील आरोपी खासगी डॉ. सुभाष बिश्वास यांच्या रुग्णालयात उपचारासाठी आली होती. उपचाराच्या बहाण्याने आरोपी डॉक्टरने तिला केबिनमधील चेकअप बेडवर झोपवून तिच्याशी गैरवर्तणूक केले.

दरम्यान, पीडित तरुणीने आरडाओरड करताच तरुणीचा भाऊ केबिनमध्ये धावून आला. यावेळी डॉक्टरने तिच्या भावासोबतही बाचाबाची केली. तत्काळ पीडित तरुणीने बेडगाव पोलिस मदत केंद्र गाठून डॉक्टराविरोधात तक्रार दाखल केली.

स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचा व्हिडीओ चित्रित करणाऱ्या इंजिनिअरला अटक; मोबाइल ताब्यात

Web Title: Mumbai actresss son jumps from 57th floor ends his life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 10:22 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai Crime
  • Sucide

संबंधित बातम्या

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी
1

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं
2

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या
3

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

Uttarpradesh Crime: माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, 4 जण गंभीर
4

Uttarpradesh Crime: माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, 4 जण गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.