Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Airport Customs: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई; दुबईहून तस्करी करून आणलेले १.८ कोटींचे सोने आणि गॅझेट्स जप्त

Mumbai Airport Customs News: मुंबई विमानतळावर १ आणि २ मे रोजी कस्टम्सने मोठी कारवाई करत ९५ लाखांचे सोने आणि ८४ लाखांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. तस्करी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 03, 2026 | 08:59 PM
मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई (Photo Credit- X)

मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई
  • दुबईहून तस्करी करून आणलेले १.८ कोटींचे सोने आणि गॅझेट्स जप्त
  • तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा तपास सुरू
Mumbai Airport Customs Action: मुंबई सीमा शुल्क विभागाच्या (Customs Zone-III) एअरपोर्ट कमिशनरच्या पथकाने १ आणि २ मे २०२६ दरम्यान तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवली आहे. या कारवाईत इलेक्ट्रॉनिक वस्तू, महागडे कॉस्मेटिक्स, सिगारेट आणि सोन्याची तस्करी उघडकीस आली असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ‘स्पॉट’ आणि ‘अ‍ॅडव्हान्स पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम’ (APIS) प्रोफाइलिंगच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये, दुबईहून अमिरातच्या (Emirates) फ्लाईट क्रमांक EK-502 ने आलेल्या दोन प्रवाशांची तपासणी करण्यात आली. या प्रवाशांकडून एकूण ८४.३७ लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, कॉस्मेटिक्स आणि विदेशी सिगारेटचे साठे जप्त करण्यात आले आहेत.

विमानाच्या शौचालयात लपवून आणले सोने

तपासणी दरम्यान एका प्रकरणात अधिकाऱ्यांनी विमानाची सखोल झडती घेतली. यावेळी विमानातील मागील बाजूच्या दोन्ही शौचालयांमधील कमोडमध्ये तपकिरी रंगाच्या टेपने गुंडाळलेली आठ पाकिटे आढळून आली. अत्यंत गोपनीय पद्धतीने पाकिटे लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न कस्टम्सच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे.

Pune Accident : नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात, कंटेनरवर कार आदळली अन्…

९५ लाखांचे सोने जप्त; प्रवाशाला अटक

एका अन्य कारवाईत दुबईहून स्पाईसजेटच्या (SpiceJet) फ्लाईट क्रमांक OSG-5114 ने आलेल्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. या प्रवाशाकडून ६९५ ग्रॅम २४ कॅरेट कच्चे सोने जप्त करण्यात आले आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे ९५.३२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित प्रवाशाला सीमा शुल्क कायदा, १९६२ (Customs Act, 1962) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा तपास सुरू

कस्टम्स विभागाने जप्त केलेल्या सर्व वस्तूंबाबत सखोल चौकशी सुरू केली आहे. अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे तस्करीच्या मोठ्या नेटवर्कशी काही संबंध आहेत का आणि त्याचे इतर साथीदार या गुन्ह्यात सहभागी आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. विमानतळावरील कडक बंदोबस्त आणि तांत्रिक तपासणीमुळे तस्करीचे हे मोठे प्रयत्न हाणून पाडण्यात कस्टम्सला यश आले आहे.

Pune Murder : दारु पिण्याच्या कारणावरुन वाद; मजुराचा डोक्यात दगड घालून खून

Web Title: Mumbai airport customs seizes gold worth 95 lakhs smuggling case marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • crime news
  • customs department
  • Gold
  • mumbai airport

संबंधित बातम्या

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या
1

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या

लग्नाच्या सातव्या दिवशीच पत्नी गेली सोडून; नैराश्येत पतीची गळफास घेऊन आत्महत्या
2

लग्नाच्या सातव्या दिवशीच पत्नी गेली सोडून; नैराश्येत पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पाकिस्तानात निकाह, ‘लेडी स्लीपर सेल’चा संशय… जयपूरमधून संशयित गुप्तहेर अटकेत; तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती बबीता
3

पाकिस्तानात निकाह, ‘लेडी स्लीपर सेल’चा संशय… जयपूरमधून संशयित गुप्तहेर अटकेत; तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती बबीता

कलीम कुरेशी टोळीला पोलिसांचा मोठा दणका, थेट मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार अद्यापही फरार
4

कलीम कुरेशी टोळीला पोलिसांचा मोठा दणका, थेट मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार अद्यापही फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.