Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Accident: 17 जूनला गावी जाणार होता… पण त्याआधीच मुंबईत काळाने गाठलं; BEST बस अपघातात तरुणाचा मृत्यू

मुंबईतील दादर येथे बेस्ट बसचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. बसने अनेक वाहनांना धडक दिल्याने स्विगी डिलिव्हरी बॉय नियाज अहमद याचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. नियाज हा कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य असून तो लग्नासाठी गावी जाणार होता.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 10, 2026 | 09:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दादरमध्ये बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक देत भीषण अपघात घडवला.
  • स्विगी डिलिव्हरी बॉय नियाज अहमदचा जागीच मृत्यू, सहा जण जखमी.
  • लग्नासाठी गावी जाण्याची तयारी सुरू असतानाच नियाजवर काळाने झडप घातली.
मुंबई: मुंबईतील दादर परिसर रविवारी सकाळी एका भीषण अपघाताने हादरला. वीर कोतवाल उद्यानाजवळ भरधाव बेस्ट बसचे नियंत्रण सुटल्याने अनेक वाहनांना जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. विशेष म्हणजे, मृत तरुण काही दिवसांत लग्नासाठी गावी जाणार होता.

काय घडलं नेमकं?

दादरवरून मार्ग क्र. 463 वर धावणाऱ्या इलेक्ट्रिक बेस्ट बसने सोमवारच्या (8 जून) सकाळी 9.30 च्या सुमारास वीर कोतवाल गार्डनजवळ नियंत्रण गमावलं. यात बसने एका क्रेनला जोरदार धडक दिली. यानंतर खाजगी कार, टॅक्सी, उबर कॅब आणि दोन दुचाकींसह पाच वाहनांनाही चिरडलं. या अपघातात इतर सहा जण जखमी झाले आहेत. तर, नियाज अहमद याचा मृत्यू झाला. बसने धडक दिली तेव्हा अहमद त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर होता. त्याला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. दुसरा डिलिव्हरी कामगार, 22 वर्षीय ऋषभ गुप्ताच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Jalgaon Crime: जळगावात थरारक हत्याकांड! किरकोळ कारणावरून वृद्धाची हत्या, एक आरोपी ताब्यात

बहिणीच्या लग्नासाठी पैसे साठवले आणि…

या प्रकारातील मृत अहमद हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. नियाज रोजगाराच्या शोधात पाच वर्षांपूर्वी मुंबईत आले होते. नियाज चांगल्या संधींच्या शोधात होता. मात्र तात्पुरत्या स्वरूपात स्विगीमध्ये डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. तो आपल्या चुलत भावासोबत राहत होता. त्याचा भाऊ एक रोजंदारी मजूर आहे. त्याचे आई-वडील आणि लहान बहीण उत्तर प्रदेशात राहतात. पूर्वी तो हातगाडीवर कांदा- बटाटा विकायचा, पण नंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी पैसे साठवण्यासाठी त्याने स्विगीमध्ये काम सुरू केले होते. असे नियाजच्या काकांनी रोज अली यांना सांगितलं.

तर नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, त्याने नुकतीच लग्नाची चर्चा सुरू केली होती. लग्नाविषयी बोलणी सुरू असून यासाठी तो 17 जूनला होणाऱ्या वधूच्या कुटुंबाला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशला जाणार होता, असंही अली यांनी सांगितलं. मात्र आता या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे.

दरोड्याच्या तयारीतील टोळी आंबेगाव पोलिसांच्या जाळ्यात, कोयता अन् मिरची पावडर जप्त; तिघांना अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात कुठे घडला?

    Ans: मुंबईतील दादरच्या वीर कोतवाल उद्यानाजवळ हा अपघात घडला.

  • Que: मृत तरुण कोण होता?

    Ans: नियाज अहमद नावाचा स्विगी डिलिव्हरी बॉय या अपघातात मृत्यूमुखी पडला.

  • Que: अपघाताचे कारण काय होते?

    Ans: बेस्ट बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने अनेक वाहनांना धडक दिली.

Web Title: Mumbai crime horrific best bus accident in dadar out of control bus mows down 5 vehicles one youth killed six injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai News: मोठी बातमी! मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू; २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम; मोर्चे आणि जमावावर पोलिसांची नजर
1

Mumbai News: मोठी बातमी! मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू; २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम; मोर्चे आणि जमावावर पोलिसांची नजर

Alibag Crime: 36 तासांत चोरीचा उलगडा! रेवदंडा पोलिसांनी ओडिशातील आरोपीला दुचाकीसह पकडलं
2

Alibag Crime: 36 तासांत चोरीचा उलगडा! रेवदंडा पोलिसांनी ओडिशातील आरोपीला दुचाकीसह पकडलं

Ketan Agrawal Case: ‘He Is Caring and Kind’… साखरपुड्यात केतनचं कौतुक करणाऱ्या सियाचा VIDEO Viral; महिनाभरानंतर नवा ट्विस्ट
3

Ketan Agrawal Case: ‘He Is Caring and Kind’… साखरपुड्यात केतनचं कौतुक करणाऱ्या सियाचा VIDEO Viral; महिनाभरानंतर नवा ट्विस्ट

Mumbai BEST Bus Accident: बेस्टला झालयं तरी काय? मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; ६५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू, तर ७ जण जखमी
4

Mumbai BEST Bus Accident: बेस्टला झालयं तरी काय? मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; ६५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू, तर ७ जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.