चाकूने सपासप वार
सुमन ही चंदेश अॅकॉर्ड या निवासी संकुलात अनेक घरांमध्ये घरकाम करत होती. मंगळवारी चंदेश अॅकॉर्ड बिल्डिंग क्रमांक 27 मधील एका घरात तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले असून, तिच्या पोटात दोन, छातीत एक आणि मानेवर एक असे गंभीर वार करण्यात आले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला तात्काळ गुरुकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
आरोपी फरार
या घटनेची माहिती मिळताच काशीमिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपी फरार आहे. त्याच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
दारू पिण्यावरून वाद, पतीच्या बेदम मारहाणीत 29 वर्षीय पत्नीचा मृत्यू; फरार पतीला अटक
मुंबई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दारू पाण्यावरून नवरा- बायकोमध्ये वाद झाला. याच वादातून नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेची ओळख कविता महेश वाड (वय २९) अशी आहे. तर आरोपीचे नाव महेश नारायण वाड असे आहे. हत्या केल्यांनतर आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली.
काय घडलं नेमकं?
महेशने आपल्या पत्नी कविताची निर्घृणपणे हत्या केली. तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, त्यात ती गंभीर जखमी झाली. नंतर कविताला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वेळेवर उपचार न झाल्याने तिची प्रकृती खालावली. शवविच्छेदनातून समोर आले की, कवितावर अत्यंत गंभीर शारीरिक हल्ला झाला होता. तिच्या शरीरावर अनेक काळे-निळे डाग होते.
Ans: मिरा-भाईंदरच्या काशीमिरा परिसरात.
Ans: सुमन, 40 वर्षीय घरकामगार महिला.
Ans: घटनास्थळी तपास सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.






