Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हनीट्रॅपचा धक्कादायक प्रकार! मुंबईच्या उद्योगपतीला जाळ्यात ओढून महिला क्रिकेटरने उकळले 63 लाख रुपये

Mumbai Crime : सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकून महिला क्रिकेटपटूने २८ वर्षीय व्यावसायिकाकडून केली पैशांची लूट. यात तिचा भाऊ आणि आणखी एक साथीदार सामील असून पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 24, 2026 | 10:25 AM
हनीट्रॅपचा धक्कादायक प्रकार! मुंबईच्या उद्योगपतीला जाळ्यात ओढून महिला क्रिकेटरने उकळले 63 लाख रुपये

हनीट्रॅपचा धक्कादायक प्रकार! मुंबईच्या उद्योगपतीला जाळ्यात ओढून महिला क्रिकेटरने उकळले 63 लाख रुपये

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील उद्योगपतीला ऑनलाइन ओळखीच्या माध्यमातून जाळ्यात अडकवून मोठी फसवणूक करण्यात आली.
  • धमक्या देत आणि दबाव टाकत आरोपींनी लाखोंची रक्कम उकळली.
  • पोलिसांनी आरोपींना अटक करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
फसवणूकीचे प्रकार वाढत असतानाच आता यात आणखी एका मोठ्या घटनेची नोंद झाली आहे. मुंबईतील उद्योगपतीला आपल्या जाळ्यात अडकवून एका महिला क्रिकेटपटूने तब्बल ६३ लाख रुपये लुटले. यासंबंधित मुंबई पोलिसांनी आता महिला क्रिकेटपटू आणि तिच्या भावाला अटक केली आहे. माहितीनुसार, त्यांनी दिल्लीतील एका हाॅटेलमधून ताब्यात घेण्यात आलं. तर त्यांच्या आणखी एका साथीदाराला जम्मू आणि काश्मीर येथील श्रीनगर येथून ताब्यात घेण्यात आलं. आरोपींची ओळख फरखांदा खान (३०) आणि तिचा भाऊ, बाझिल खान (२७) आणि साथीदार उद्दीन इम्तियाज वानी (२२) अशी पटली आहे. तक्रारीनुसार, फसवणूक झालेला व्यक्ती हा कुलाबा येथील २८ वर्षांचा व्यावसायिक असून सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकून त्याच्याकडून ही पैशांची लूट करण्यात आली आहे.

Ashok Kharat Case : अशोक खरातबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर; सरकारी डॉक्टरला सोबत घेऊन…

काय आहे प्रकरण?

२०२४ मध्ये तक्रारदार व्यावसायिक फरखांदा खानला भेटला. मोबाईल चॅटद्वारे त्यांची ओळख झाली ज्यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढू लागली. आरोपी महिला ही मूळची जम्मू काश्मीरमधील असून ती जम्मू काश्मीरची राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. ती महिला टी-20 लगीमध्येही सहभागी झाली होती. पोलिसांच्या सांगण्यावरुन जवळीक साधून महिलेने आर्थिक गरजेचं कारण सांगत व्यावसायिकाकडे पैशांची मागणी केली. पण जेव्हा त्याने हे पैसे देण्यास नकार दिला तेव्हा फरखांदाने त्याला धमकवण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही तर त्यांच्यातील अश्लिल चॅट सार्वजनिक करेल अशी धमकी ती व्यावसायिकाला करु लागली.

अखेर दबावाखाली येऊन व्यावसायिकाने ३० एप्रिल २०२४ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत ३२ बँक व्यवहारांद्वारे एकूण २३ लाख रुपये फरखांदाच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. तपासात समोर आले की, या रकमेतील मोठा भाग हा उद्दीन इम्तियाज वानी याच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आला. तर यातील काही रक्कम तिने वडील, अब्दुल अझीझ खान यांच्या खात्यातही ट्रान्सफर केली.

लेकीबाबत ‘ते’ शब्द ऐकताच बाप संतप्त; रॉडने वार करून थेट हत्याच

माहितीनुसार, फरखांदाचा भाऊ देखील त्यांच्यातील चॅट्सचे स्क्रिनशाॅर्ट दाखवून तक्रारदाराला पुन्हा पुन्हा तुरुंगवासाची धमकी देत होता. या धमक्यांनी कंटाळून व्यावसायिकाने पुन्हा एकदा ४० लाख रुपये आरोपींच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. तक्रारीच्या आधारे, आता पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८(२), ३०८(६), ३५१(२), ३५१(३) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा आता सखोल तपास करत आहे.

 

Web Title: Mumbai honeytrap case woman cricketer extorts 63 lakh from mumbai businessman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • crime news
  • fraud
  • threatens

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.