Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update: अवयवदानातून मिळते इतरांना नवजीवन! अमरावतीत विविध उपक्रम; गैरसमज दूर करून जागृतीची गरज

मृत्यूनंतर किंवा काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींमध्ये हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे यांसह डोळ्यांचे दान केले जाते. एखाद्या गरजू व्यक्तीला जीवनाची नवी संधी मिळावी, असा यामागील प्रमुख उद्देश आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 13, 2026 | 02:45 PM
अवयवदानातून मिळते इतरांना नवजीवन! अमरावतीत विविध उपक्रम; गैरसमज दूर करून जागृतीची गरज

अवयवदानातून मिळते इतरांना नवजीवन! अमरावतीत विविध उपक्रम; गैरसमज दूर करून जागृतीची गरज

Follow Us
Follow Us:

मृत्यूनंतरही आपल्या शरीरातील अवयव दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करू शकतात. हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे यांसह डोळ्यांचे दान करून गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना नवजीवन मिळू शकते. ‘अवयवदानाचा संकल्प करा; मृत्यूनंतरही कोणाच्या तरी आयुष्यात नवजीवनाची पहाट आणा,’ असा संदेश जागतिक अवयवदान दिनानिमित्त देण्यात येत आहे. अवयवदान जनजागृतीच्या उद्देशाने येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ३ ते १३ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आ. सुलभा खोडके यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करीत, ‘एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनाची नवी संधी मिळू शकते. त्यामुळे अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती आवश्यक आहे’, असे सांगितले. राष्ट्रीय व जागतिक अवयवदान जनजागृती अभियानांतर्गत ‘ग्रीन लाईट’ मोहिमेतून हे उपक्रम राबविले जात आहेत. रॅली, व्याख्याने, शपथविधी आणि प्रबोधनपर कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती केली जाणार आहे.(फोटो सौजन्य – istock)

Cancer चा धोका लवकर ओळखण्यासाठी नियमित आरोग्य तपासणीतील कोणते घटक महत्त्वाचे ठरू शकतात? जाणून घ्या सविस्तर

गैरसमज दूर करणे आवश्यकः

मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची संमती आणि वैद्यकीय निकष पूर्ण झाल्यानंतर विविध अवयव प्रत्यारोपणासाठी दान करता येतात. अवयवदानानंतर शरीराची विटंबना होते किंवा अंत्यसंस्कारात अडथळा येतो, हे गैरसमज आहेत. प्रक्रिया प्रशिक्षित वैद्यकीय पथकाकडून नियमांनुसार आणि सन्मानपूर्वक केली जाते. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत आरोग्य यंत्रणेकडून माहिती घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

कुटुंबीयांची भूमिका महत्त्वाचीः

अवयवदानाची इच्छा व्यक्त केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्या निर्णयाची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांशी अवयवदानाबाबत चर्चा करून आपली इच्छा स्पष्टपणे सांगावी, असे आवाहन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केले जाते. अमरावतीतील हरीना फाउंडेशन गत १६ वर्षांपासून नेत्रदान, अवयवदान आणि देहदानाबाबत सातत्याने जनजागृती करीत आहे. या कार्याची सुरुवात एका चिमुकलीच्या निधनातून झाली. ८ मे २०१० रोजी साडेतीन वर्षीय हरीना नरेश सोनी हिचे विजेचा धक्का लागून निधन झाले. याप्रसंगी कुटुंबीयांनी तिचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यातून दोन नेत्रहीनांच्या जीवनात प्रकाश आला. १० मे २०१० रोजी तिच्या स्मृतिप्रित्यर्थ हरीना नेत्रदान समितीची स्थापना झाली आणि पुढे या उपक्रमाचे मोठ्या जनआंदोलनात रूपांतर झाले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अवयवदान म्हणजे काय?

    Ans: मृत्यूनंतर किंवा काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींमध्ये दान केलेले अवयव गरजू रुग्णांच्या प्रत्यारोपणासाठी वापरले जातात. यालाच अवयवदान म्हणतात.

  • Que: अवयवदानामुळे किती लोकांना मदत होऊ शकते?

    Ans: दान केलेल्या अवयवांमुळे एकापेक्षा अधिक रुग्णांना प्रत्यारोपणाची संधी मिळू शकते. त्यामुळे अवयवदानाला जीवनदानाचे महत्त्व आहे.

  • Que: कोणते अवयव दान करता येतात?

    Ans: वैद्यकीय निकषांनुसार हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड यांसारखे अवयव तसेच कॉर्निया आणि काही ऊती दान करता येऊ शकतात.

Web Title: Organ donation gives others a new lease on life various initiatives in amravati need to dispel misconceptions and raise awareness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • amravati
  • Health Updates
  • Organ Donation

संबंधित बातम्या

रेडक्लिफ लॅब्सने मेगाव्हिजन डायग्नोस्टिक्सच्या अधिग्रहणाद्वारे एकात्मिक डायग्नोस्टिक्स धोरणाला दिली नवी गती
1

रेडक्लिफ लॅब्सने मेगाव्हिजन डायग्नोस्टिक्सच्या अधिग्रहणाद्वारे एकात्मिक डायग्नोस्टिक्स धोरणाला दिली नवी गती

Health Update: ४५ अंशांचे हाड कापले अन् पाठ सरळ! अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिसने वाकलेल्या तरुणाला नवजीवन
2

Health Update: ४५ अंशांचे हाड कापले अन् पाठ सरळ! अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिसने वाकलेल्या तरुणाला नवजीवन

Health Update: ‘थ्री-डी मॉडेल’वरच होणार कर्करोग संशोधन? ‘टूडी’ आता पडणार मागे; आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून नवी दिशा
3

Health Update: ‘थ्री-डी मॉडेल’वरच होणार कर्करोग संशोधन? ‘टूडी’ आता पडणार मागे; आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून नवी दिशा

नखांचा रंग फिकट झाला आहे? महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यास दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
4

नखांचा रंग फिकट झाला आहे? महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यास दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.