मध्य प्रदेशमधुन एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जबलपूरमध्ये घडलेल्या या धक्कदायक घटनेने खळबळ उडाली आहे. अधारताल पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला. विशेष म्हणजे, या महिलेने आपल्या पतीचा मृत्यू पाण्यात बुडल्याने झाल्याचा बनावही उभा केला. मात्र, पोस्टमार्टम अहवाल समोर आल्यानंतर तिचा खोटेपणा उघड झाला आणि संपूर्ण हत्याकांडाचा पर्दाफाश झाला.
भिवंडी ठाणे बायपास रोडवर भीषण आघात; दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू;
आरोपी महिलेचे नाव गणेशी बाई असून मृत व्यक्ती तिचा पती अरविंद आहे. हे दोघं जबलपूरमधील अधारताल परिसरात राहत होते. गणेशी बाईने आधी आपल्या पतीची हत्या केली. त्यांनतर त्याला तलावात फेकून दिल. त्यानंतर आपला पती बुडाल्याचे तिने सांगितले. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच या महिलेचा बनाव समोर आला.
त्याचा मृत्यू हा तलावात बुडाल्यामुळे नाही तर कोणीतरी त्याच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तुने प्रहार केल्यामुळे झाला आहे असं पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये निष्पन्न झालं. पोलिसांना त्याच्या पत्नीवर संशय आला, पोलिसांनी यासंदर्भात मृत व्यक्तीच्या पत्नीकडे कसून चौकशी केली, चौकशीमध्ये तीने हत्येची कबुली दिली आहे.
तिने तिच्या पतीची हत्या आधी दगडाने प्रहार करून निर्घृण हत्या केली. त्यानंतर पतीचा मृतदेह एका तलावात नेऊन तिने फेकून दिला आणि पोलिसांसमोर असा बनाव केला की तिचा पती बुडून मरण पावला.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गणेशी बाईने हत्येची कबुली दिली आहे. पती आणि तिच्यामध्ये सतत वाद होत होता. रोजच्या वादाला कंटाळून तिने आपल्या पतीच्या डोक्यात दगड टाकला त्यानंतर त्याला तलावात फेकून दिले. त्यानंतर तिने आपल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र पोस्ट मार्टम रिपोर्टमुळे सत्य बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
IIT Bombay: धक्कादायक! IITबॉम्बेमध्ये अज्ञात व्यक्तीचे वास्तव्य …; 14 दिवसांनंतर अटक