काय घडलं नेमकं?
मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बेबी काळू मालुसरे असे आहे. तर आरोपीचे नाव समीर काळू मालुसुरे असे आहे. समीर मालुसरे याने त्याची आई बेबी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिल्याने समीर संतापला. रंगाच्या भरात समीरने लोखंडी रॉड घेऊन आईच्या डोक्यात आणि तोंडावर वार केले. या हल्ल्यात बेबी मालुसरे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. हत्येनंतर त्याने बेबी मालुसरे यांचा मृतदेह घरातच ठेवला. त्यांनतर घराला बाहेरून कुलूप लावले. एवढेच नाही तर त्याने शेजाऱ्यांना आई गावाला गेली असल्याचे सांगितले.
काही काळानंतर समीर पुन्हा घराजवळ आला. तेव्हा त्याने आई घरातच आहे असे सांगितले. त्यांनतर हत्येचा सगळा प्रकार समोर आला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी भोर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घराची पाहणी केल्यानंतर घटनेची माहिती घेतली आणि आरोपी समीर मालुसरे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पुणे पोलिसांच्या ‘धिंड पॅटर्न’ला ब्रेक! अटक आरोपींचे फोटो-व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासही बंदी
गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून राबविला जाणारा ‘धिंड पॅटर्न’ वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी नरमाईचे धोरण स्विकारले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अटक आरोपींच्या वागणुकीसंदर्भात कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आरोपींचा सार्वजनिक अपमान होईल, अशा कोणत्याही प्रकारची वागणूक देऊ नये, तसेच त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसिद्ध होणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमानाचा अपघात; विमान कोसळल्याने परिसरात खळबळ
Ans: म्हाळवडी
Ans: लोखंडी रॉड
Ans: भोर पोलीस






